शेतातील माेटारपंप व केबल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST2021-06-25T04:07:52+5:302021-06-25T04:07:52+5:30

नरखेड : अज्ञात आराेपीने शेतातील विहिरीवर लावलेला माेटारपंप व त्याला लागलेला १,०६० फूट केबल असा एकूण २२ हजार रुपये ...

Field water pumps and cable lamps | शेतातील माेटारपंप व केबल लंपास

शेतातील माेटारपंप व केबल लंपास

नरखेड : अज्ञात आराेपीने शेतातील विहिरीवर लावलेला माेटारपंप व त्याला लागलेला १,०६० फूट केबल असा एकूण २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तिनखेडा शिवारात मंगळवारी (दि.२२) सकाळी उघडकीस आली.

भूषण गजानन महल्ले (३२, रा. दिदरगाव, ता. नरखेड) यांची तिनखेडा शिवारात शेती असून, त्यांनी शेतातील विहिरीवर लावलेला माेटारपंप किंमत १० हजार रुपये आणि १२ हजार रुपये किमतीचा विद्युत केबल असा एकूण २२ हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात आराेपीने चाेरून नेला. शिवाय, आराेपीने माेटारपंपाला लागलेला राेलपाईप कापून नुकसान केले. ही बाब लक्षात येताच भूषण महल्ले यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी भादंवि कलम ३७९, ४२७ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस नाईक राजेश हावरे करीत आहेत.

Web Title: Field water pumps and cable lamps