दिवाळीनिमित्त नागपूर-करमाळी, मुंबईसाठी 'फेस्टिव्हल स्पेशल' रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 18:31 IST2021-10-17T14:27:56+5:302021-10-17T18:31:27+5:30
नागपूर : रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छटपूजेसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून नागपूर-करमाळी आणि नागपूर-मुंबई दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा ...

दिवाळीनिमित्त नागपूर-करमाळी, मुंबईसाठी 'फेस्टिव्हल स्पेशल' रेल्वेगाड्या
नागपूर :रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छटपूजेसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून नागपूर-करमाळी आणि नागपूर-मुंबई दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२३९ नागपूर-करमाळी फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी प्रत्येक शनिवारी ३० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान नागपूरवरून दुपारी ३.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता करमाळी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०१२४० करमाळी-नागपूर फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी प्रत्येक रविवार, ३१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान करमाळीवरून रात्री ८.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला रात्री ८.१० वाजता पोहोचेल.
दोन्ही गाड्यांना वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, नासिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, सिंधुदुर्ग, कुदळ, सावंतवाडी, आणि थिविम येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्या एक एसी टू टायर, ४ एसी थ्री टायर, ११ स्लिपर आणि ६ सेकंड क्लास सिटिंग कोच राहणार आहेत, तर रेल्वेगाडी क्रमांक ०१२४७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी प्रत्येक शुक्रवारी २९ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून रात्री १०.४५ वाजता सुटून नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १.१० वाजता पोहोचेल.
रेल्वेगाडी क्रमांक ०१२४८ नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी प्रत्येक शनिवारी ३० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान नागपूरवरून सायंकाळी ५.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, धामनगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात एक फर्स्ट एसी, दोन एसी टू टायर, ५ स्लिपर क्लास आणि ६ सेकंड क्लास सिटिंग कोच राहणार आहेत. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.