महिला अधिकाऱ्याची फसवणूक

By Admin | Updated: June 5, 2017 02:01 IST2017-06-05T02:01:31+5:302017-06-05T02:01:31+5:30

राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमी (आॅर्डिनन्स फॅक्ट्री) अंबाझरी येथे कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांची स्थावर मालमत्ता (घर अन् भूखंड) तिच्या सख्ख्या भावाने आपल्या साथीदारांच्या मदतीने हडपली.

Female officer cheating | महिला अधिकाऱ्याची फसवणूक

महिला अधिकाऱ्याची फसवणूक

मालमत्तेसाठी कारस्थान : सख्खा भाऊच आरोपी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमी (आॅर्डिनन्स फॅक्ट्री) अंबाझरी येथे कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांची स्थावर मालमत्ता (घर अन् भूखंड) तिच्या सख्ख्या भावाने आपल्या साथीदारांच्या मदतीने हडपली. त्यानंतर वडिलांच्या नावाने भलत्याच आरोपीला समोर करून बनावट कागदपत्रांद्वारे या भूखंडांवर ५० लाखांचे कर्ज उचलले. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी अजय ऊर्फ सूरज अरुण ठाकरे याला अटक केली.
धरती श्यामसुंदर लुलेकर (वय ४८) यांची सीताबर्डीत वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता आहे. धरती यांना नितीन श्यामसूंदर लुलेकर नामक भाऊ आहे. त्याला ही स्थावर मालमत्ता हडपायची होती. त्यासाठी त्याने अजय ऊर्फ सूरज अरुण ठाकरे व त्याची पत्नी सोनी अरुण ठाकरे यांची मदत घेतली. अजयने नितीनशी संगनमत करून ३१ मार्च २०१७ ला बँकेतून गृहकर्ज उचलून रक्कम लाटण्याची योजना सांगितली. त्यासाठी धरती यांच्या वडिलांचे घर खरेदी करण्यासाठी सिव्हील लाईनमधील आयसीआयसीआय बँकेत गृहकर्जासाठी प्रस्ताव सादर केला. तो मंजूर झाल्यानंतर ५० लाख रुपये कर्जाची उचल केली. त्यानंतर ते घर नितीन लुलेकर याला स्वत:च्या नावे करून घ्यायचे होते. त्यामुळे त्याने योगेश पुरुषोत्तम खापरे आणि सुभाष पुंडलिक शेंडे यांना आपल्या कारस्थानात सहभागी करून घेतले. ६ एप्रिल २०१७ ला या तिघांनी नितीनचे वडील श्यामसुंदर यांच्या ऐवजी भलत्याच एका व्यक्तीला म्हाळगी नगर चौकातील दुय्यम निबंधक कार्यालयात हजर केले. हेच श्यामसुंदर आहेत,
असे सांगून त्यांची सही घेऊन घराचे विक्रीपत्र नितीनच्या नावे करून घेतले. नंतर त्या घरावर उचललेल्या कर्जाची ५० लाखांची रक्कम नितीन आणि श्यामसुंदर नावाची तोतया व्यक्ती या दोघांच्या नावाने हुडकेश्वरमधील ओव्हरसीज बँकेच्या खात्यात वळती करण्यात आली. ती रक्कम मुख्य आरोपी अजय ठाकरे याने त्याचा साथीदार आरोपी आशिष सहारे याच्या मदतीने स्वत:च्या बँक खात्यात वळती करून घेतली.
ही रक्कम आठही आरोपींनी आपापसात वाटून घेतली. या बनवाबनवीची माहिती कळाल्यानंतर धरती लुलेकर यांनी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडे २७ मे रोजी तक्रार नोंदवली. एसीपी सोमनाथ वाघचौरे यांनी एपीआय चोपडे आणि अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने तपास करवून घेतला असता धरती लुलेकर यांच्यासोबतच बँकेचीही फसवणूक करणाऱ्या या प्रकरणात नितीनसोबतच अजय ठाकरे हासुद्धा मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. कारण बँकेतून रक्कम उचलल्यानंतर त्या ५० लाखांची वाटणी करताना २५ लाख ठाकरेच्या, २४ लाख आशिष सहारेच्या आणि १ लाख रुपये नितीन लुलेकरच्या नावाने असलेल्या बँक खात्यात जमा करून घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी ठाकरेला अटक केली. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Female officer cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.