चाकूचा धाक : रेल्वेच्या लोको पायलटसह दोघांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 10:50 PM2020-09-15T22:50:01+5:302020-09-15T22:51:29+5:30

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेच्या एका लोको पायलटला तर यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना घडली.

Fear of a knife: Two people, including a railway loco pilot, were robbed | चाकूचा धाक : रेल्वेच्या लोको पायलटसह दोघांना लुटले

चाकूचा धाक : रेल्वेच्या लोको पायलटसह दोघांना लुटले

Next
ठळक मुद्देतहसील, यशोधरानगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेच्या एका लोको पायलटला तर यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना घडली. सचिनकुमार राधेलाल वर्मा (वय ३४ हे बल्लारशा (जि.चंद्रपूर) च्या बालाजी नगरातील रहिवासी आहेत. ते रेल्वेत लोको पायलट म्हणून सेवारत आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे ते रेल्वेने बल्लारशा येथून नागपूरला आले. कर्तव्य संपल्यानंतर वर्कशॉपला आराम करण्यासाठी ते पायी जात होते. सोमवारी मध्यरात्री मोटरसायकलने आलेल्या चार आरोपींनी त्यांना रोखले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांना रोख तसेच मौल्यवान वस्तूची मागणी केली. वर्मा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्या हातावर चाकू मारून त्यांना जखमी केले आणि त्यांच्या जवळचा मोबाईल तसेच ७०० रुपये आणि कागदपत्रे हिसकावून नेली. वर्मा यांनी वर्कशॉपमध्ये पोहचल्यानंतर ही घटना सहकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर तहसील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
त्याचप्रमाणे सोमवारी रात्री ११ च्या सुमारास उज्ज्वल अनिल निनावे (वय १८) हा बिनाकी मंगळवारी परिसरात राहणारा तरुण त्याचा मित्र अमन इंदूरकर याच्याकडे वैशाली नगरात लॅपटॉप आणायला गेला होता. लॅपटॉप मिळाला नाही. त्यामुळे तो दुचाकीने घराकडे परत निघाला. यशोधरानगरातील सेलिब्रेशन हॉलसमोर मोबाईल वाजल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा राहून तो मोबाईलवर वडिलांशी बोलू लागला. तेवढ्यात दुचाकीवर तीन आरोपी आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून उज्ज्वलला मारहाण केली आणि त्याच्या जवळचा ऐपल कंपनीचा २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. उज्ज्वलने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला.

एका आठवड्यात पाच घटना
शहरात शुक्रवारी वाठोडात एका डॉक्टरला, रविवारी शांतिनगरात एका वृद्धेला, शनिवारी सोनेगावात एका तरुणीचे दागिने दोन भामट्यांनी चाकूच्या धाकावर लुटले तर सोमवारी रात्री यशोधरानगर आणि मंगळवारी पहाटे तहसीलमध्ये लुटमारीची घटना घडली. लुटमारीच्या या वाढत्या घटनांमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Fear of a knife: Two people, including a railway loco pilot, were robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.