शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST

सावनेर/नरखेड/काटोल/ कळमेश्वर/ कुही/रामटेक/हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संकट कायम आहे. सोमवारी तेरा तालुक्यात १७८० रुग्णांची भर पडली ...

सावनेर/नरखेड/काटोल/ कळमेश्वर/ कुही/रामटेक/हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संकट कायम आहे. सोमवारी तेरा तालुक्यात १७८० रुग्णांची भर पडली तर ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णाला उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण भागात नातेवाईकांची दिवसभर धावपळ दिसून आली.

कोरोनाच्या विळख्यात असलेल्या सावनेर तालुक्यात २३९ रुग्णांची नोंद झाली तर ८ जणांचा मृत्यू झाला. शहरात ७१ नागरिक बाधित झाले तर ग्रामीण भागात ही संख्या १६३ वर पोहोचली.

नरखेड तालुक्यात १२१ रुग्णांची भर पडली. यात शहरातील २३ तर ग्रामीण भागातील ९८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५७१ तर शहरात २६७ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात (३१), जलालखेडा (३१), मेंढला (१२) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावात २४ रुग्णांची नोंद झाली.

काटोल तालुक्यात ८५४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १८४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ६१ तर ग्रामीण भागातील १२३ रुग्णांचा समावेश आहे.

रामटेक तालुक्यात १६० रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ४५ व ग्रामीण भागातील ११५ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४४०७ झाली आहे. यातील २२३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २१७५ इतकी आहे.

कळमेश्वर तालुक्यात १४२ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील २४ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात धापेवाडा येथे सर्वाधिक १८ रुग्णांची नोंद झाली.

कुही तालुक्यात ८१८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ९१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात एकूण बाधितांची संख्या २८३३ इतकी झाली आहे. सोमवारी कुही शहर आणि परिसरात २३, मांढळ (११), वेलतूर (३५), साळवा (४) तर तितूर येथे ११ रुग्णांची नोंद झाली.

हिंगणा तालुक्यात २३९ रुग्ण

हिंगणा तालुक्यात सोमवारी १५४९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २३९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात सर्वाधिक ७० रुग्णांची नोंद वानाडोंगरी येथे झाली. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९१४९ झाली आहे. यातील ५७६४ रुग्ण बरे झाले आहेत तर १७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.