शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  २१ हॉटेल्सवर एफडीएची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:19 IST

उघड्यावर आणि घाणीत तयार होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारी उघडकीस आणताच खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) चार पथकाने मिळून मध्यवर्ती रेल्वेस्थानकासमोरील २१ हॉटेल्सवर धाडी टाकून तपासणी केली.

ठळक मुद्देअनेकांकडे परवानेच नाही घाणीत तयार होणारे भोजन पाहून अधिकारीही चक्रावले तीन तास चालली कारवाईलोकमत इम्पॅक्ट

लोकमत न्यूज नेटवर्क सुमेध वाघमारे/ दयानंद पाईकरावनागपूर : उघड्यावर आणि घाणीत तयार होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारी उघडकीस आणताच खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) चार पथकाने मिळून मध्यवर्ती रेल्वेस्थानकासमोरील २१ हॉटेल्सवर धाडी टाकून तपासणी केली. अस्वच्छ, मळकट व माशा घोंगवणाऱ्या हॉटेल्समध्ये उघड्यावरच पोळ्या लाटण्यापासून ते भाजीला फोडणी देण्याची कामे पाहून पथकातील अन्न सुरक्षा अधिकारीही चक्रावले. अनेकांकडे हॉटेल्स चालविण्याचा परवानाही नव्हता. काहींचे किचन पाहून तर अधिकाऱ्यांना उलट्या येण्याची वेळ आली. बुधवारी या सर्व हॉटेल्सचालकांना नोटीस बजावली जाईल, अशी माहिती अन्न प्रशासनाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.शहराचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या रेल्वेस्थानकासमोरील काही हॉटेल्सचालकांनी प्रवाशांच्या व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. कुठल्याही सोयी नसताना पुलाच्या खाली ४० वर हॉटेल्स धडाक्यात सुरू आहे. यातील दोन-चार हॉटेल्स सोडल्यास इतर सर्व हॉटेल्समध्ये अस्वच्छता, घाण, उघड्यावर खाद्यपदार्थ, उघडे किचन असेच दृश्य ‘लोकमत’ चमूला दिसले. बहुसंख्य हॉटेल्स चालकांनी तर भोजन तयार करण्यासाठी रस्त्यावरच भट्टी लावली आहे. त्यामुळे रस्त्यावरील धूळ थेट अन्नपदार्थात पडून ग्राहकांच्या थाळीत येते. काही हॉटेल्सचालक तर भोजन तयार करण्यासाठी फूटपाथही सोडत नाही. भातापासून ते भाज्या चिरण्यापर्यंत सर्व कामे फूटपाथवर होतात. अस्वच्छ हॉटेलमध्ये स्वयंपाक करणारी व भोजन वाढणारी मंडळीही नीटनेटकी नाही. ज्या ताट-वाट्यांमध्ये ग्राहकांना जेवण दिले जाते त्या घाण पाण्यातून धुतल्या जातात. विशेष म्हणजे, येथे पाण्याची सोय नाही. एका खासगी टँकरच्या मदतीने हॉटेल्सवाले पाण्याचे ड्रम भरुन ठेवतात. त्यातून अन्नपदार्थ तयार केले जाते तेच पाणी ग्राहकांना पिण्यास दिले जाते, याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने ‘येथे मिळतो विकतचा आजार’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे हॉटेल्स चालकांचे धाबे दणाणले. पाच-सहा हॉटेल्स चालकांनी तर आपले हॉटेल्स उघडलेच नाही. काहींनी दुपार नंंतर बंद केले तर काहींनी ‘एफडीए’ची धाड पडत असल्याचे पाहत ग्राहकांना आत घेऊन बाहेरून शटर बंद केले.  

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरfoodअन्न