मोबाईलवर जास्त बोलते म्हणून वडील रागावले; तरुणीने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 21:23 IST2022-11-05T21:16:59+5:302022-11-05T21:23:48+5:30
Nagpur News वडिलांच्या मोबाईलवरून मैत्रिणीशी बोलत असताना जास्त वेळ बोलल्यामुळे वडिलांनी रागावल्याने १८ वर्षीय युवतीने आत्महत्या केली.

मोबाईलवर जास्त बोलते म्हणून वडील रागावले; तरुणीने लावला गळफास
नागपूर : वडिलांच्या मोबाईलवरून मैत्रिणीशी बोलत असताना जास्त वेळ बोलल्यामुळे वडिलांनी रागावल्याने १८ वर्षीय युवतीने आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसरात घडली.
मृत तरुणीचे नाव खुशबू हारुडे (१८) आहे. तिने बारावीनंतर शिक्षण सोडले होते. घरचे तिच्या लग्नासाठी वर शोधत होते. शुक्रवारी खुशबू वडिलांच्या मोबाइलवरून एका मैत्रिणीशी बोलत होती. जास्त वेळ बोलत असल्यामुळे वडील तिला रागावले. वडिलांचे बोलणे तिच्या मनाला लागल्याने तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील प्रभुदयाल हारूडे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.