बापलेकांनी मिळून केली तरुणाची हत्या; नागपुरातील मानकापूर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:57 IST2018-01-13T16:57:15+5:302018-01-13T16:57:48+5:30

जुन्या वादातून एका तरुणाची बाप व लेकाने मिळून हत्या केल्याची घटना येथे शनिवारी पहाटे घडली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीहरीनगरात परिसरात मंगेश श्रावण खोटे (२७)याचा मृतदेह आढळून आला.

Father and son kills teenager; An incident in Manakpur in Nagpur | बापलेकांनी मिळून केली तरुणाची हत्या; नागपुरातील मानकापूर येथील घटना

बापलेकांनी मिळून केली तरुणाची हत्या; नागपुरातील मानकापूर येथील घटना

ठळक मुद्देएकमेकांना शिवीगाळ करण्यावरून वाद वाढत गेला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जुन्या वादातून एका तरुणाची बाप व लेकाने मिळून हत्या केल्याची घटना येथे शनिवारी पहाटे घडली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीहरीनगरात परिसरात मंगेश श्रावण खोटे (२७)याचा मृतदेह आढळून आला.
मंगेश खोटे आणि आरोपी लोणारे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी राजकुमार लोणारे याने मंगेशच्या घरी जाऊन त्याला शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली होती. राजकुमारचा मुलगा जॉकी यानेही शुक्रवारी मंगेशला शिवीगाळ केली होती. परिणामी संतप्त मंगेश व त्याच्या आईने, पुष्पा खोटेने (५३) लोणारे बापलेकाला त्याचा जाब विचारला. त्यावेळीही या दोघांनी मंगेश व त्याच्या आईला शिवीगाळ करीत धमक्या दिल्या होत्या. या घटनेनंतर मंगेश व त्याची आई घरी परत गेल्यानंतर मंगेशने रात्री ७ च्या सुमारास आरोपीच्या घरी जाऊन येतो असे सांगितले व तो घरातून निघून गेला. पुष्पा खोटेने त्याला रोखले मात्र त्याने तिचे ऐकले नाही. मध्यरात्र उलटूनही तो परत आला नाही म्हणून पुष्पा खोटेने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला व पोलिसांना कळवले. पोलिसांनी शोध घेतला असता पहाटे ४ च्या सुमारास मंगेश श्रीहरीनगरात मृतावस्थेत आढळला. आरोपी जॉकी व त्याचे वडील राजकुमार लोणारे या दोघांनी त्याला दगड आणि लाकडी फळीने ठेचून मारल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले. पोलिसांनी पुष्पा खोटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Father and son kills teenager; An incident in Manakpur in Nagpur

टॅग्स :Murderखून