शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

करुणाजनक : वृद्धेचा जीव गेला अन् मुलगा आरोपी बनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 22:48 IST

निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या एका तरुणाला त्याच्या आईच्या ममतेपासून कायमचे मुकावे लागले. दुसरीकडे त्याच्या आईच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी आशिष महादेवराव चौधरी (वय २७) नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ९ ३० च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली.

ठळक मुद्देहलगर्जीपणामुळे झाला अपघात : गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या एका तरुणाला त्याच्या आईच्या ममतेपासून कायमचे मुकावे लागले. दुसरीकडे त्याच्या आईच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी आशिष महादेवराव चौधरी (वय २७) नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ९ ३० च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली.गोरेवाडा वस्ती, उत्थाननगरात राहणारा आशिष महादेवराव चौधरी (वय २७) हा त्याची आई चंद्रकलाबाई (वय ६०) यांना शुक्रवारी सकाळी आपल्या मोटरसायकलवर बसवून कोंढाळीहून नागपूरला येत होता. नवीन काटोल नाका वळणावर वेग जास्त असल्याने खड्ड्यातून मोटरसायकल उसळली. परिणामी चंद्रकलाबाई खाली पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना लगेच खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुभांगी सुभाषराव गाडगे (वय २६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी चौकशी केली. अपघाताला आणि चंद्रकलाबाई यांच्या मृत्यूला आशिषचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आशिषविरुद्ध गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणा केल्यामुळे एकीकडे आशिषला त्याच्या आईला कायमचे गमवावे लागले तर दुसरीकडे एक गंभीर गुन्हाही त्याच्याविरुद्ध दाखल झाला.

 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू