अवैध सावकाराने केला जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:12 IST2021-09-07T04:12:35+5:302021-09-07T04:12:35+5:30

नागपूर : एका अवैध सावकाराने पाचपावली येथील टेकानाका परिसरातील बँकेपुढे दिवसाढवळ्या एका युवकावर जीवघेणा हल्ला करत त्याला जखमी केले ...

Fatal attack by an illegal moneylender | अवैध सावकाराने केला जीवघेणा हल्ला

अवैध सावकाराने केला जीवघेणा हल्ला

नागपूर : एका अवैध सावकाराने पाचपावली येथील टेकानाका परिसरातील बँकेपुढे दिवसाढवळ्या एका युवकावर जीवघेणा हल्ला करत त्याला जखमी केले आहे.

टेका नाका निवासी ३५ वर्षीय शफिक अन्सारी खासगी काम करतात. ते सोमवारी दुपारी ३.३० वाजता एचडीएफसी बँकेत वाहनाचा हप्ता भरण्यासाठी आले होते. बँकेच्या बाहेर निघताच अवैध सावकार युवक व त्याच्या भावांनी शफिकवर हल्ला चढवला. रॉड व काठ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. हा प्रकार बघताच बँकेचे कर्मचारीही शफिक यांच्या मदतीसाठी धावले असता हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. शफिकवर उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार शफिकने हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या युवकाकडून २ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यातील दीड लाख रुपये परत केले होते. उर्वरित ५० हजार रुपयासाठी त्यांच्यात वाद सुरू होते. या वादातूनच हा हल्ला करण्यात आला आहे. बाबा बुद्धाजीनगर निवासी हल्लेखोर युवक अवैध सावकारी करतो. त्याचा उत्तर नागपुरात चांगला वट आहे. पोलिसांनी अज्ञान आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. शफिकचे बयाण अद्याप झालेले नसल्याने हल्लेखोरांची नावे उघडकीस आलेली नाहीत.

........

Web Title: Fatal attack by an illegal moneylender