ठळक मुद्देस्कॉर्पियोची दुचाकीला जोरदार धडक
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी रोडवरील मोहम्मद अली पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पियो कारच्या धडकेत एक दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. अभिमन्यू डोरले असे जखमीचे नाव आहे. ते आजनी ग्राम पंचायतचे सचिव राहुल डोरले यांचे वडील असल्याचे सांगितले जाते. हा अपघात शनिवारी रात्री ८.३० वाजता घडला.