शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

फॅशन, प्रसिद्धीसाठी कुठलेही सेवाकार्य नको - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 12:47 IST

ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरण

नागपूर : कुणाचीही सेवा किंवा सेवाकार्य करताना त्यात आपलेपणाची भावना असणे आवश्यक असते. सेवेतूनच जिव्हाळा व आपुलकी वाढते. त्यामुळे सेवा करताना त्यातून काही मिळेल, असा विचारही मनात यायला नको. फॅशन व प्रसिद्धीसाठी कुठलेही सेवाकार्य नको, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. शुक्रवारी ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला समाजसेवक डॉ. विकास आमटे, तेलंगणा येथील उद्योजक कोठा जयपाल रेड्डी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. वा. द. भाके, सचिव डॉ. दीपक कडू प्रामुख्याने उपस्थित होते. मनुष्य व जानवरांमध्ये मोठा फरक असतो. तरीदेखील पशू एकत्रित असतानादेखील आजारी असलेल्याची काळजी करतात. अनेक लोक सेवाकार्य करताना कार्यक्रमांना प्रसिद्ध लोकांना बोलवितात. त्यापेक्षा त्या कार्याशी संबंधित व त्याला पुढे नेणाऱ्या लोकांना बोलविले पाहिजे. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तर सामाजिक कार्यात विशेष पुढाकार घेतला पाहिजे, असे डॉ. भागवत म्हणाले. डॉ. भाके यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. दीपक कडू यांनी आभार मानले. यावेळी प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

पोलीस, वकील, डॉक्टर वाढणे हे समाजाच्या अनारोग्याचे लक्षण यावेळी डॉ. विकास आमटे यांनी परखड शब्दांत आपले मत मांडले. समाजात पोलीस, वकील, डॉक्टर यांची संख्या वाढणे हे समाजाच्या अनारोग्याचे निदर्शक आहे. न्यायालयांची, कारागृहांची संख्या वाढणे हे भूषणावह नाहीच. आम्ही आनंदवनात कार्य करतो, मात्र हे आनंदवन बंद करणे हेच आमचे मिशन आहे. तेथील कुष्ठरोग पाहता आनंदवनाचे कार्य वाढणे हे भूषणावह राहूच शकत नाही. देशातील सव्वा कोटी कुष्ठरोग्यांकडे समाजाने लक्ष दिले पाहिजे. मात्र देशातील ११९ कायदे कुष्ठरोग्यांच्या विरोधातील आहे. त्यावर काय करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बाबा आमटेंनी घेतले होते पिस्तूल

यावेळी सरसंघचालक डॉ. भागवत यांनी बाबा आमटेंबाबत एक माहिती दिली. त्यांना संघाचे तत्कालीन प्रचारक यादवराव जोशी यांनी ही माहिती दिली होती. इंग्रजांशी संघर्ष सुरू असताना बाबा आमटे यांनी पिस्तूल घेतले होते. ही बाब तत्कालीन सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना कळली, तेव्हा त्यांनी आमटे यांच्याशी संवाद साधला. आमटे तुमची भावना चांगली आहे, मात्र याच्या परिणामांचादेखील विचार करा, असे ते म्हणाले होते, असे सरसंघचालकांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकMohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर