शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे कापसाचे कोट्यवधीचे चुकारे पचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:19 IST

काटोल तालुक्यातील येनवा येथील मे. साई युथ अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीने नागपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे पचविल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे इतर दोन भागीदार यांनाही अटक करून, शेतकऱ्यांचे चुकारे तत्काळ मिळावेत, अशी मागणी पीडित कापूस उत्पादक संयोजन समितीचे संयोजक सुरेंद्र रेवतकर यांनी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्देमे. साई युथ अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् कंपनीच्या दोन संचालकांना अटकचुकारे लवकरात लवकर मिळावे शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल तालुक्यातील येनवा येथील मे. साई युथ अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीने नागपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे पचविल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे इतर दोन भागीदार यांनाही अटक करून, शेतकऱ्यांचे चुकारे तत्काळ मिळावेत, अशी मागणी पीडित कापूस उत्पादक संयोजन समितीचे संयोजक सुरेंद्र रेवतकर यांनी पत्रपरिषदेत केली.काटोल परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मे. साई युथ अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीला कापूस विकला. कंपनीने सर्व शेतकऱ्यांना धनादेश दिले. परंतु शेतकऱ्यांचे धनादेश वटलेच नाही. दुसऱ्यांदा पुन्हा कंपनीकडून शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले. तेसुद्धा वटले नाही. त्यानंतर कंपनीने शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत बोलावून एकूण रकमेच्या ५० व २५ टक्के रकमेचे चेक दिले. त्याचीही रक्कम बॅँकेतून मिळाली नाही. जवळपास १०१ शेतकऱ्यांचे १ कोटी ९४ लाख रुपयांचे चुकारे अडकून असल्याचा आरोप समितीचे संयोजक सुरेंद्र रेवतकर यांनी केला.या संपूर्ण प्रकरणाची तक्रार शेतकऱ्यांनी बाजार समितीचे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी २३ जानेवारीला बैठक घेऊन संचालकाला बोलाविले. संचालकाने ३१ जानेवारीपर्यंत चुकारे देण्याचे मान्य केले. परंतु दिलेली तारीखही त्यांनी पाळली नाही. शेवटी शेतकऱ्यांनी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर, वर्षा लाखेकर, राहुल साठोने, राजेश साठोने यांच्याविरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला. अखेर पोलिसांनी राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. परंतु वर्षा लाखेकर व रमेश साठोने यांच्यावर कारवाई केली नाही. या दोन्ही संचालकांना अटक करावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांच्या समितीने केली आहे. तसेच संचालकांची संपत्ती विकण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. पत्रपरिषदेला गजानन बोंद्रे, बालाजी ढाले, अनिल लाड, रामेश्वर पाटील, नेकचंद चोरघडे, ज्ञानेश्वर धुंदे, कृष्णराव बावीस्कर, नंदकिशोर मुरोडिया, हेमकांत चिवडे, अखिलेश चपट, चंद्रशेखर गाखरे, नितीन नखाते, सुखदेव वाघे आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीMediaमाध्यमे