शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:54 IST2021-02-05T04:54:57+5:302021-02-05T04:54:57+5:30
महाकृषी ऊर्जा अभियानाचा शुभारंभ : मागणीपत्र सोपविले नागपूर : शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज आणि ६० दिवसात विजेची जोडणी ...

शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज ()
महाकृषी ऊर्जा अभियानाचा शुभारंभ : मागणीपत्र सोपविले
नागपूर : शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज आणि ६० दिवसात विजेची जोडणी तसेच पाच वर्षात ५ लाख कृषी पंप वितरणाचे लक्ष्यासह प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर महावितरणचे महाकृषी ऊर्जा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते यानिमित्त १६ शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे मागणीपत्र प्रदान करण्यात आले. कस्तुरचंद पार्कमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात नितीन राऊत यांच्या हस्ते बबन काटोले, आनंद सदावर्ते, विमल बानाईत, नरेंद्र बागडे, सुमन कठाने, मीना कठाने, नामदेव भारस्कर, भैयालाल नाईक, मनोज रामटेके, रमेश चव्हाण, पुरुषोत्तम भावपूरकर, जोगेश सावल, दयाराम सातपुते, संगीत राऊत, भालचंद्र किंमतकर व मंगला इटनकर यांना मागणीपत्र देण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, अमित परांजपे, कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी उपस्थित होते. रंगारी आणि दोडके यांनी शेतकऱ्यांना ऊर्जा धोरणाबाबत माहिती देऊन नवी जोडणी घेण्यात येणाऱ्या अडचणी त्वरित दूर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
............