शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मुलांनी साकारला ‘फ्लाईंग ईव्ही’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 12:00 IST

अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावे यासाठी दहेगाव रंगारी (जि.नागपूर) येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘फ्लाईंग ईव्ही’ नावाचा प्रकल्प साकारला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने मान्यताही दिली आहे. 

ठळक मुद्देहा हेल्थ डिव्हाईस वाचविणार अनेकांचा जीव केंद्र सरकारचे पेटंटही मिळविले

जितेंद्र ढवळे/अरुण महाजन

नागपूर : गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्त (गंभीर रुग्ण) रुग्णालयात वेळेत पोहोचू न शकल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. महानगरात तर वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका रस्त्याच्या मधोमध अडकण्याच्या घटनाही नव्या नाहीत ! या सर्व गोष्टी टाळून रुग्णाला तातडीने उपचार मिळावे यासाठी दहेगाव रंगारी (जि.नागपूर) येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘फ्लाईंग ईव्ही’ नावाचा प्रकल्प साकारला आहे. त्याच्या या प्रकल्पाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने मान्यताही दिली आहे. 

बी. ई. मेकॅनिकल असलेला शुभम (डॅनी) अरविंद कोलते आणि त्याची बहीण शितल किशोर तराळे बी. ई .(इलेक्ट्रॅानिक्स) यांनी हा प्रकल्प तयार केला आहे. हेल्थ डिव्हाईस आणि ग्रीन कॅरिडॉर असे या प्रकल्पाचे दोन प्रमुख टप्पे आहेत. त्यास त्यांनी ‘फ्लाईंग ईव्ही’ असे नाव दिले आहे. शुभमचे वडील वेकोलिमध्ये पंप खलाशी म्हणून कामावर होते. निवृत्तीनंतर ते आता शेती करतात. 

काय आहे हेल्थ डिवाईस ?

हेल्थ डिवाईस (हेल्थ कार्ड) या प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. याअंतर्गत प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती डिजीटल स्वरूपात साठविली जाईल.  हे डिजीटल हेल्थकार्ड रुग्णांच्या आरोग्य तपासणीनंतर वेळोवेळी अपडेट केले जाईल.

कसे काम करेल हेल्थ डिवाईस ?

- या हेल्थ डिवाईसमध्ये बायोमॅट्रीक पद्धतीने प्रत्येकाची माहिती साठविली जाईल. समजा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला. त्यात तो बेशुद्ध झाला असला तरी बायोमॅट्रिक पद्धतीचा अवलंब करून त्याचा हेल्थ आयडी शोधला जाईल. - हा आयडी रुग्णवाहिकेतील वैद्यकीय मदतनीस संबंधित रुग्णालयाला देईल. वैद्यकीय अधिकारी या आयडीच्या आधारावर संबंधित व्यक्तीची मेडिकल हिस्ट्री जाणून घेऊन योग्य ते उपचारही करू शकतील. 

काय आहे ग्रीन कॅरिडोर?

- ग्रीन कॅरिडोर हा या प्रकल्पाचा दुसरा टप्पा आहे. यात अपघातग्रस्त व्यक्ती/रुग्णाला तातडीने रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यवस्था निर्माण केली जाईल. समजा महामार्गावर एखादा अपघात झाला तर रुग्णाला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयापर्यंत पोहोचविले जाते. या रुग्णवाहिकेत रुग्णाला टाकल्यानंतर रुग्णवाहिकेतील डिवाईस सर्व्हरच्या माध्यमातून ॲक्टिव्हेट होईल.- अपघातग्रस्तस्थळापासून रुग्णालयात जाईपर्यंत मार्गात येणारे वाहतूक अडथळे दूर करण्यासाठी ही यंत्रणा काम करेल.-  समजा एखादी रुग्णवाहिका ‘अ’ स्थळापासून निघाली असेल आणि ‘ब’ आणि ‘क’ ठिकाणी वाहतूक कोंडी असेल तर तेथील वाहतूक सिग्नलवर असलेल्या डिवाईसच्या माध्यमातून रुग्णवाहिका रुग्णालयापर्यंत पोहोचिवण्यासाठी ग्रीन कॅरिडोर (वाहतूक मुक्त रस्ता) साकारला जाईल. 

स्मार्ट सिटीसाठी तयार केला जातोय प्रस्ताव

नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पात ही संकल्पना वास्तवात साकारली जावू शकते का, यासाठी शुभम याच्याकडून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सीईओ भुवनेश्वरी एस. यांना याबाबतचे सादरीकरण शुभमने केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलAccidentअपघातJara hatkeजरा हटकेtechnologyतंत्रज्ञानscienceविज्ञान