शेतकरी अडचणीत आहे, सरकार लवकर स्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:14 IST2019-11-14T11:42:09+5:302019-11-14T12:14:21+5:30
शेतकरी अडचणीत आहेत, सरकारची स्थापना लवकरात लवकर व्हावी अशी मागणी काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली.

शेतकरी अडचणीत आहे, सरकार लवकर स्थापन करा
ठळक मुद्देशरद पवारांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
नागपूर: शेतकरी अडचणीत आहेत, सरकारची स्थापना लवकरात लवकर व्हावी अशी मागणी काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. काटोल तालुक्यातील चारगाव येथील रवींद्र पुनवटकर या शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या अतोनात नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यावेळी अनेक शेतकरी बांधवांनी पवारांसमोर आपापल्या समस्या मांडल्या. अतिवृष्टीमुळे या तालुक्यातील शेतातीतल कापूस, सोयाबीन आदी पिके नष्ट झाली आहेत.
यावेळी शरद पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, आशिष देशमुख व अन्य पदाधिकारी होते.