शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

मूठभर कापूस जाळून शेतकरी संघटनेने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 22:34 IST

केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे सांगत शेतकरी संघटनेने आज शुक्रवारी कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मूठभर कापूस जाळून निषेध व्यक्त केला. लॉकडाऊन असतानाही चार ते पाच जणांनी एकत्र येऊन तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे सांगत शेतकरी संघटनेने आज शुक्रवारी कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मूठभर कापूस जाळून निषेध व्यक्त केला. लॉकडाऊन असतानाही चार ते पाच जणांनी एकत्र येऊन तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सीसीआयने शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी करावा आणि शासनाने भावांतर योजना लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली.नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशिमसारख्या कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलक सहभागी झाले होते. नागपुरात शेतकरी संघटनेच्या कार्यालयात कापूस जाळून आंदोलन करण्यात आले. यात अरुण केदार, मुकेश मासुरकर, गुलाबराव धांडे, अरुण भोसले, विनोद चितळे आदी उपस्थित होते.शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते राम नेवले यांनी राज्यात २४ हजार शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, खुल्या बाजारात व्यापारी प्रति क्विंटल ३ हजार ते ४२०० रुपयांचा भाव देऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारची कंपनी सीसीआय ५५०० रुपये प्रति क्विंटलच्या भावाने खरेदी करीत आहे. आजही शेतकºयांजवळ ३५ टक्के कापूस शिल्लक आहे. तो तातडीने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन