करण कोठारी ज्वेलर्समध्ये शानदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:22 IST2020-12-04T04:22:17+5:302020-12-04T04:22:17+5:30
नागपूर : दक्षिण भारताच्या टेम्पल ज्वेलरीपासून बंगालपर्यंत वेगवेगळ्या डिझाईनचे पोल्की, डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी संपूर्ण भारतात कोणत्याही वधूच्या पोशाखाला ...

करण कोठारी ज्वेलर्समध्ये शानदार
नागपूर : दक्षिण भारताच्या टेम्पल ज्वेलरीपासून बंगालपर्यंत वेगवेगळ्या डिझाईनचे पोल्की, डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी संपूर्ण भारतात कोणत्याही वधूच्या पोशाखाला शोभते. केकेजेपीएलचे संचालक प्रदीप कोठारी म्हणाले, आम्ही ‘मुहूर्त’ वेडिंग ज्वेलरी आणली आहे. ‘मुहूर्त’चा अर्थ उत्सवासाठी शुभवेळ असा आहे. ‘मुहूर्त’ आभूषणाचा संग्रह भारताच्या कोणत्याही भागातील वधूकरिता लग्नाच्या आभूषणामध्ये सर्वोत्तम पर्याय उपलब्ध व्हावा, असा दृष्टिकोन आहे. वेडिंग कलेक्शनमध्ये डायमंड सेट, गोल्ड सेट, जडाऊ ज्वेलरी, बांगड्या, पोल्की सेट, मंगळसूत्रासह अन्य शानदार आभूषणाचा समावेश आहे. धरमपेठ येथील शोरूममध्ये सविता संचेती यांच्या हस्ते ‘मुहूर्त’ वेडिंग कलेक्शन दाखल करण्यात आले. तसेच इतवारी शोरूममध्ये चेतना टांक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. करण कोठारी ज्वेलर्स प्रा.लि. ची (केकेजेपीएल) स्थापना १९७४ मध्ये झाली. हे मध्य भारतातील एक प्रतिष्ठित कॉर्पोरेट आणि चेन ज्वेलरी स्टोअर आहे. हे स्टोअर गुणवत्ता आणि असाधारण विविधतेच्या मापदंडासाठी विश्वसनीय आहे. या समारंभात करण कोठारी ज्वेलर्सचे अनेक सन्मानित ग्राहक उपस्थित होते. त्यांनी नवीन वेडिंग कलेक्शनची कारागिरी आणि डिझाईनची प्रशंसा केली. ललित कोठारी यांनी सर्व ग्राहकांना ‘मुहूर्त’ वेडिंग कलेक्शनला पाहण्यासाठी धरमपेठ आणि इतवारी शोरूममध्ये आमंत्रित केले आहे. (वा.प्र.)