शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

प्रसिद्ध न्यूरो सर्जन व कवी लोकेंद्र सिंह  म्हणतात , लोकांची मानसिकताच खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:16 PM

लोकांचे डोके नाही तर मानसिकताच खराब आहे. हे तर एका हार्डवेअरसारखे आहे. त्यात आपण जसे सॉफ्टवेअर अपलोड केले, तसे परिणाम मिळतील. आमचा देश महान आहे, परंतु नागरिकांमध्ये महानता नाही. आम्ही आमचे नैतिक कर्तव्य आणि मूल्य जाणून घेत नाही. भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे खराब मानसिकतेचे प्रतीक असल्याचे मत सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन व कवी लोकेंद्र सिंह ‘सरजन’ यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ‘संवाद’मध्ये मांडले विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकांचे डोके नाही तर मानसिकताच खराब आहे. हे तर एका हार्डवेअरसारखे आहे. त्यात आपण जसे सॉफ्टवेअर अपलोड केले, तसे परिणाम मिळतील. आमचा देश महान आहे, परंतु नागरिकांमध्ये महानता नाही. आम्ही आमचे नैतिक कर्तव्य आणि मूल्य जाणून घेत नाही. भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे खराब मानसिकतेचे प्रतीक असल्याचे मत सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन व कवी लोकेंद्र सिंह ‘सरजन’ यांनी व्यक्त केले.बुधवारी सायंकाळी झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या ‘संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. सिंह यांचा जीवन प्रवास, संघर्ष, यश आणि साहित्याबाबत डॉ. सागर खादीवाला यांनी संवाद साधला. आपल्या जीवन प्रवासाबाबत ते म्हणाले, मथुरेत माझा जन्म झाला. कुटुंब जयपूरमध्ये स्थायिक झाले. येथूनच शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर न्यूरो सर्जनच्या रूपाने काही वेळ काम केले. वडिलांच्या आदेशामुळे मी ते सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचा विचार केला. परंतु मला डोक्याच्या उपचारात आवड निर्माण झाली. चंदीगडवरून न्यूरो सर्जरीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दरम्यान, प्रोफेसरने मला नागपुरात डॉ. टावरींकडे पाठविले. या शहराच्या आत्मियतेने मला परत जाऊ दिले नाही. कार्यक्रमात डॉ. सिंह यांच्या पत्नी मधुबाला सिंह यांनीही वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीचा काळ गंमतीशीर मांडला. चर्चेपूर्वी साहित्यिक मधुप पांडेय यांनी डॉ. सिंह यांचा शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.सर्जन ते सरजनचा प्रवासडॉ. खादीवाला यांच्या साहित्य क्षेत्रात पदार्पणाबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, कॉलेजमध्ये पॅथालॉजी विभागाच्या निवडणुकीदरम्यान एक हास्य कविता लिहिली. ती लोकांना खूप आवडली. त्यानंतर गंभीरपणे मी ‘मस्तिष्क और मेरे बीच संवाद’च्या कल्पनेला कवितेत बदलविले. आयएमएच्या मंचावर पहिल्यांदा सादरीकरण केले. त्यानंतर हा छंद जडला आणि आज ६५० पेक्षा अधिक कविता लिहिल्या. सर्जन सोबत साहित्याचे सृजन करता करता मी सरजन झालो.जिंकणे-हरण्याचा निकाल त्वरितसर्जन म्हणून काम करतानाच्या संघर्षाबाबत ते म्हणाले, ‘मी औषध देतो, तो (ईश्वर) रक्षा करतो.’ डॉक्टरला नेहमी रुग्ण लवकर बरा व्हावा, असे वाटते. डॉक्टरच्या व्यवसायावर चुकीचे आरोप होतात. या व्यवसायात जिंकण्याचा आणि हरण्याचा निर्णय त्वरित होतो. काही डॉक्टरांनी यास व्यवसायाचे रूप दिले आहे. परंतु त्यासही समाजच जबाबदार आहे. कोट्यवधी रुपये खर्च केल्यावर डॉक्टरच्याही अपेक्षा वाढतात.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर