शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडीयावर जमतोय कौटुंबिक गोतावळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 20:39 IST

मोबाईलच्या युगात माणूस माणसापासून दुरावत चालला की काय, अशी भीती जाणवू लागली आहे. ही भीती काही प्रमाणात खरी असली तरी तंत्रज्ञानाचे फायदेही असतातच. आधुनिक पिढीने याच तंत्रज्ञानाचा लाभ घेत दुरावलेल्या नातेवाईकांना सोशल मिडीयावरील ग्रुपच्या माध्यमातून एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्ट फोन बाळगणाऱ्या प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीचा एखादा तरी कौटुंबिक ग्रुप आहेतच. यात एकाच शहरात असलेले किंवा वेगवेगळ्या शहरात, इतकेच नव्हे तर देशाबाहेर असणारे नातेवाईक एकमेकांशी संवाद साधू लागले आहेत. या माध्यमातून हा कौटुंबिक गोतावळा जमू लागला आहे.

ठळक मुद्देजागतिक कुटुंब दिन विशेषकुटुंबाला संयुक्त ठेवण्याचा आधुनिक प्रयत्नदूरवर असलेल्या नातलगांचा कौटुंबिक संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईलच्या युगात माणूस माणसापासून दुरावत चालला की काय, अशी भीती जाणवू लागली आहे. ही भीती काही प्रमाणात खरी असली तरी तंत्रज्ञानाचे फायदेही असतातच. आधुनिक पिढीने याच तंत्रज्ञानाचा लाभ घेत दुरावलेल्या नातेवाईकांना सोशल मिडीयावरील ग्रुपच्या माध्यमातून एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्ट फोन बाळगणाऱ्या प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीचा एखादा तरी कौटुंबिक ग्रुप आहेतच. यात एकाच शहरात असलेले किंवा वेगवेगळ्या शहरात, इतकेच नव्हे तर देशाबाहेर असणारे नातेवाईक एकमेकांशी संवाद साधू लागले आहेत. या माध्यमातून हा कौटुंबिक गोतावळा जमू लागला आहे.पूर्वी कौटुंबिक संवाद समोरासमोर होत होता. परगावातील नातेवाईकांना भेटण्यासाठी खास वेळ काढला जायचा. अगदी दूरच्या नातेवाईकांसाठी टपाल, दूरध्वनी अशी साधने उपलब्ध होती. त्यानंतर संवादाचे स्वरूप बदलून गेले. कामाच्या गडबडीत आवर्जून एखाद्याला फोन करायचे दिवस आता राहिले नाहीत. नोकरी-व्यवसायामुळे कुटुंबातील वातावरण विसंवादी बनू लागले आहे. मात्र सोशल मिडियामुळे जगातील कानाकोपऱ्यात असलेल्या कुटुंबातील सदस्यांना गप्पाटप्पा मारण्यासाठी हा ई-कट्टा मिळाला आहे. कुटुंबातील बहुतेक प्रत्येक सदस्याच्या स्मार्ट फोनमध्ये या ग्रुपने जागा घेतली असून, कौटुंबिक ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपमध्ये २०० हून अधिक सदस्य सामावून घेण्याची क्षमता असल्याने मोठा ई-गोतावळा तयार झाला आहे. कुटुंबातील तरुण सदस्य त्यासाठी पुढाकार घेत आहेत, हे विशेष.कुटुंब-नातेवाईकांमधील प्रत्येकाच्या वेळा सांभाळून एखाद्या कार्याचे नियोजन करणे अनेकदा शक्य होत नाही. पण गु्रपमुळे याबाबतच चर्चा मोकळेपणाने होतात. या चर्चेत सर्वच सदस्यांना सहजपणे सहभागी होता येत असल्याने प्रत्येकाला त्याचा आनंद मिळतो. वाढदिवस, लग्न किंवा कोणत्याही कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ ग्रुपवर अपलोड केले जातात. त्यामुळे या कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी न झालेल्यांनाही त्याचा आनंद घेता येत आहे. कुटुंबातील अनेक सदस्य परगावी किंवा परदेशात असतात. त्यांनाही या ग्रुपमुळे कुटुंबात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये सहभागी होता येते. त्यामुळे दुरावलेली कुटुंबे एकत्र येऊ लागली आहेत. अनेकांना आपल्या कुटुंबातील नातेवाईक गवसले आहेत. शिवाय व्हिडीओ कॉलिंगनेही संवादाचे अंतर जवळ केले आहे.या ग्रुपमध्येही आई-वडील, बहीण-भावांचा स्वतंत्र गु्रप, त्यानंतर इतर नातेवाईकांचा वेगळा ग्रुप, कुटुंबातील महिला, पुरुष सदस्य, मुला-मुलींचाही वेगळा ग्रुप असतो. प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्या वयानुसार चर्चा होत असतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील सदस्यांना स्वातंत्र्य मिळते. या ग्रुपलाही मजेशीर नावे दिली जातात. अनेक ग्रुपची नावे आडनावाने सुरू होतात. स्वीट फॅमिली, ग्रेट फॅमिली, फॅमिलीज, फॅमिली रॉक्स, पारिवारिक विचार मंडळ, अशी आगळीवेगळी नावेही दिली जातात.गाव झाले कुटुंबनोकरी व कामानिमित्त आपापल्या गावातून निघून अनेक जण शहरात आले आणि येथेच स्थायिक झाले. परंतु गावाला मात्र विसरले नाहीत. अशा लोकांनी आपापल्या गावाच्या नावांनीही ग्रुप तयार केले आहेत. नागपूर शहरात ग्रामीण भागातून व विदर्भातील इतरही तालुक्यांमधून आलेल्या मंडळींनी आपापल्या गावांच्या नावांनीही ग्रुप तयार केले आहे. या माध्यमातून ते आपापल्या गावातील मित्र-मंडळींशी संवाद साधतात. गाव हे त्यांच्यासाठी कुटुंब बनले आहे. बहुतेक ग्रुपची नावे ही त्या-त्या गावाच्या नावावरच ठेवण्यात आलेली आहेत.प्रत्येक सण-उत्सव साजरा होतोअनेकांप्रमाणे रामकृष्णनगरातील रूपाली धवस यांनीही आपला परिवार नावाने एक ग्रुप तयार केला आहे. हा ग्रुप तयार झाल्यापासून त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले आहे. प्रत्येक सण आणि उत्सव ते मिळून साजरा करतात. कुठे जायचे, कुणाकडे भेटायचे याची सर्व चर्चा ग्रुपवर होत असते. एकमेकांच्या सुख-दु:खाची जाणीवही होत असते.संवाद वाढलासोशल मिडियामुळे परिवारातील संवाद वाढला आहे. ग्रुपमुळे अनेक चर्चा होतात. शिवाय रोज एकमेकांची आठवणही होते. आमचा परिवार मोठा असल्यामुळे पारिवारिक ग्रुपने आम्हाला जवळ आणले आहे, अशी प्रतिक्रिया प्रतापनगरातील कल्याणी लामधरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाnagpurनागपूर