शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

१०० टक्के सफाईचा फोल दावा : कोट्यवधी खर्चुनही नद्या अस्वच्छच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:43 IST

मनपाचा दावा फोल : पावसाळ्यात नदीकाठच्या लोकांचे जीवन धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नदी स्वच्छतेच्या नावावर गेल्या ५ वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्च झाले आहे. तरीही नद्या अस्वच्छच आहेत. यावर्षीही नदी सफाईवर सव्वाकोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने शहरातील तीनही नद्या १०० टक्के स्वच्छ झाल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र मनपाचा दावा फोल ठरतोय.

२०२० ते २०२४ या पाच वर्षांत नदी स्वच्छतेवर ५.६५ कोटी रुपये खर्च झाले. नद्यांची सफाई न केल्यास पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. त्यात नदी-नाल्यांच्या संरक्षण भिंती तुटल्या होत्या. त्या संरक्षण भिंती अजूनही उभ्या झाल्या नाहीत. त्यामुळे पावसाळा तोंडावर असताना नद्यांच्या काठावर राहणाऱ्यांच्या जीवनाला धोका आहे.

शहरातून वाहणाऱ्या नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीची लांबी ४९.१७ आहे. मनपा प्रशासनाचा दावा आहे की, तीनही नद्यांची १०० टक्के सफाई झाली आहे. सफाईच्या नावावर नदीच्या पात्रातील माती काढून काठावर सोडून दिली आहे. नद्यांमध्ये अजूनही जलपर्णी व कचरा दिसून येत आहे. काही ठिकाणी वरवरच स्वच्छता केल्याचेही स्पष्ट दिसत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या बैठकीत आरोप केला होता की, मेट्रो रिजनअंतर्गत असलेल्या नद्यांच्या भागाची सफाई झालेली नाही. ३० जूनपर्यंत सफाईचे काम पूर्ण करावे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, नद्यांची १०० टक्के सफाई झालेली नाही. तरीही मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दावा केला की, नद्यांची सफाई पूर्ण झाली आहे. 

नदी स्वच्छतेला लोकसहभागातून झाली होती सुरुवात२०१३ मध्ये महापौर अनिल सोले यांनी नदी सफाईची संकल्पना लोकसहभागातून मांडली होती. दोन वर्षे या संकल्पनेतून नदीची सफाई झाली. त्यानंतर मात्र कंपनी व ठेकेदारांकडून यंत्रणा उपलब्ध झाली नाही. परिणामी महापालिकेने बजेटमध्ये नदी स्वच्छतेसाठी विशेष तरतूद केली. तेव्हापासून या तरतुदीअंतर्गत सफाई केली जात आहे.

'लोकमत'ने केली पोलखोलमहापालिकेने न्यायालयांमध्ये शहरातील नद्या ९५ ते १०० टक्के स्वच्छ झाल्याचा दावा केला होता. मनपाच्या दाव्यानुसार 'लोकमत'ने शहरातील नद्यांच्या अवस्थेवर मालिका प्रसिद्ध केली. या वृत्तांमधून प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली.

टॅग्स :nagpurनागपूरriverनदी