शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मिरची गोदामाच्या आड बनावट दारूचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 22:20 IST

कोराडी रोडवरील आर्यनगरात मिरचीच्या गोदामाच्या आड बनावट दारू बनविण्याचा अड्डा जरीपटका पोलिसांनी उजेडात आणला आहे. या कारवाईत बनावट दारूच्या व्यवसायातील मुख्य सूत्रधाराचा कर्मचारी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

ठळक मुद्देमुख्य सूत्रधाराचा कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात : दारू बनविण्याचे साहित्य जप्त

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोराडी रोडवरील आर्यनगरात मिरचीच्या गोदामाच्या आड बनावट दारू बनविण्याचा अड्डा जरीपटका पोलिसांनी उजेडात आणला आहे. या कारवाईत बनावट दारूच्या व्यवसायातील मुख्य सूत्रधाराचा कर्मचारी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.शिवराम बिहारीलाल यादव (२१) रा. टिगहरा, सिवनी असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस मुख्य सूत्रधार, त्याचे भागीदार आणि सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री उपनिरीक्षक व्ही. बी. फरताडे व पोलीस गस्त घालत होते. त्यांना नारा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर लाल रंगाच्या दुचाकीवर पोते घेऊन जाताना एक युवक संशयास्पद अवस्थेत दिसला. त्याची दुचाकी थांबवून पोत्याची तपासणी केली असता त्यात दारूच्या रिकाम्या बाटल्यांसोबत इंग्रजी दारूच्या बॉटल्स आढळल्या. त्याला ताब्यात घेऊन साक्षीदारांसमोर चौकशी केली असता त्याने आपले नाव शिवराम यादव सांगितले. त्याने आहुजानगर येथील रहिवासी जयकुमार दर्यानी याच्याकडे काम करीत असल्याचे सांगितले. दर्यानी यांचे कोराडी मार्गावर आर्यनगरात गोदाम असून, तेथे मिरची गोदामाच्या मालकाच्या सांगण्यानुसार ब्रॅन्डेड इंग्रजी दारूच्या रिकाम्या बाटल्यात बनावट दारू भरून सील करण्यात येत असल्याचे त्याने सांगितले. जरीपटक्याचे ठाणेदार खुशाल तिजारे यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी आर्यनगर येथील गोदामात धाड टाकली. तेथे विविध इंग्रजी दारूच्या रिकाम्या बॉटल्स, झाकण सील करण्याचे साहित्य आणि दारू तयार करण्याचे लिक्वीड आढळले. त्यासोबत दोन गॅस सिलिंडरसह ५८ हजार ६६० रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारू प्रतिबंधक कायदा व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोण आहे आरोपींच्या संपर्कात?पोलिसांना जरीपटका भागात काही व्यापारी बनावट दारू विक्रीच्या व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती मिळाली आहे. आर्यनगरात मिरची गोदामाच्या आड बनावट ब्रॅन्डेड दारू विक्रीच्या सूत्रधारांचे जाळे कोणत्या डीलर, वाईन शॉपशी आहे याचा बारकाईने तपास केल्यास यातील व्यावसायिकांची माहिती मिळू शकते. त्यासाठी पोलीस संबंधितांच्या मोबाईल सीडीआरच्या तपासात लागले आहेत.मुख्य सूत्रधार, सहकारी नाही लागले हातीसूत्रांनुसार बनावट दारू विक्रीच्या व्यवसायात समोर आलेला सूत्रधार आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी वेळ लागू शकतो. परंतु त्याच्या या व्यवसायात सहभागी इतर सहकाऱ्यांचा तपास लावण्याच्या कामात पोलीस लागले आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीraidधाडArrestअटकPoliceपोलिस