शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोलीस आयुक्तांसह भंडारा अधीक्षकांचे ‘फेक प्रोफाईल’, सावध राहण्याचे आवाहन

By योगेश पांडे | Updated: September 4, 2023 12:42 IST

आयपीएस अधिकाऱ्यांचे फेसबुक खाते सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर

नागपूर : सायबर गुन्हेगारांकडून अनेकदा सोशल मीडियावर अनेकांचे ‘फेक प्रोफाईल’ तयार करून त्या माध्यमातून त्यांच्या मित्रमंडळींनी पैसे मागण्यात येतात. मात्र आता या गुन्हेगारांनी थेट आयपीएस अधिकाऱ्यांकडेच मोर्चा वळवला आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि भंडाराचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे फेसबुकवर फेक प्रोफाईल तयार करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांनी स्वत: सोशल माध्यमांवर ही माहिती शेअर करत त्यांच्या फ्रेंडलिस्टमधल्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सोशल माध्यमांवर सक्रिय असतात. फेसबुकवर त्यांचे प्रोफाईल असून त्यावर त्यांनी त्यांचा तपशीलदेखील टाकला आहे. मात्र काही दिवसांअगोदर त्यांच्या प्रोफाईल पिक्चरचा उपयोग करून अज्ञात व्यक्तीने फेक प्रोफाईल तयार केले व अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. कुमार यांचेच प्रोफाईल असल्याचा समज झाल्याने अनेकांनी त्याचा स्वीकारदेखील केला. ही बाब अमितेश कुमार यांना कळताच त्यांनी फेसबुकवर याबाबत पोस्ट केली.

तोतयागिरी करून अज्ञात व्यक्तीने माझे बनावट फेसबुक खाते तयार केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे आरोपी माझे प्रोफाईल पिक्चर आणि कव्हर फोटो वापरुन लोकांना फसवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सत्यता पडताळून पहा. या बनावट खातेधारकाला कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. तसेच कुणीही माझा संदर्भ देणाऱ्यांशी किंवा इतर कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नका, असे आवाहन अमितेश कुमार यांनी केले आहे. याच पद्धतीने लोहीत मतानी यांचेदेखील फेक अकाऊंट उघडण्यात आले आहे. ही दोन्ही खाती काही दिवसांअगोदरच उघडण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरFacebookफेसबुकPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम