एजंट देतो परीक्षा अन् अर्जदार होतो पास...; फेसलेस लर्निंग लायसन्स परीक्षेत गैरप्रकार
By सुमेध वाघमार | Updated: December 27, 2024 12:21 IST2024-12-27T12:20:32+5:302024-12-27T12:21:15+5:30
नागपूर : आरटीओची घरी बसून लर्निंग लायसन्सची परीक्षा देणारी साइट हॅक केली जात असल्याने अर्जदाराला परीक्षा न देताच लर्निंग ...

एजंट देतो परीक्षा अन् अर्जदार होतो पास...; फेसलेस लर्निंग लायसन्स परीक्षेत गैरप्रकार
नागपूर : आरटीओची घरी बसून लर्निंग लायसन्सची परीक्षा देणारी साइट हॅक केली जात असल्याने अर्जदाराला परीक्षा न देताच लर्निंग लायसन्स मिळत आहे. मागील पाच-सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. एजंट हजारो रुपयांची कमाई करीत आहेत. धक्कादायक म्हणजे, तक्रार होऊनही परिवहन विभागाने हा प्रकार गंभीरतेने घेतलेला नाही.
आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी, दलालांना फाटा देण्यासाठी व लोकांच्या सोयीसाठी बहुसंख्य सेवा ‘ऑनलाइन’ करण्यात आल्या आहेत. दरम्यानच्या काळात घरी बसूनच आरटीओची कामे करता यावी यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवा अंमलात आणली आहे. यात ‘लर्निंग लायसन्स’ काढण्यापासून अलिकडे चॉॅईस नंबर आरक्षित करण्याची सोय उपलब्ध आहे. परंतु याचा फायदा सामान्य लोकांना कमी आणि एजंटला अधिक होत असल्याचे चित्र अनधिकृत ऑनलाइन केंद्राच्या संख्येवरून दिसते.
अशी होते साइट हॅक
‘परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन’चा ‘सारथी-०४’ या वेबसाइटवर आधाररचा वापर करून फेसलेस परीक्षेसाठा अर्ज केला जातो. यासाठी एजंट स्वत:चा,अर्जदाराच्या नावाने अर्ज करतो. दोघांना दोन अर्ज क्रमांक मिळतो. एजंट ‘फेस ऑथेंटिकेशन’ दरम्यान कमांड पोर्टमध्ये वेबसाइट कोडींगमध्ये जाऊन अर्ज क्रमांक बदलतो, ज्यामुळे अर्जदाराच्या जागी इतर कोणाचाही चेहरा प्रमाणीकरण होतो.