शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

अतिरिक्त शिक्षकाची फरफट : आठ महिन्यापासून वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:36 IST

जिल्ह्यात दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढते आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. सोमवारी माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या समायोजनाच्या स्थळी अतिरिक्त ठरलेले एक शिक्षक आढळून आले. २०१७-१८ च्या संचमान्यतेत ते अतिरिक्त ठरले होते. त्यांचे समायोजन न झाल्याने आठ महिन्यापासून वेतनाविना आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी संस्थेला त्यांना रुजू करून घेण्यासाठी पत्र दिले. पण मुख्याध्यापकांनी त्यांना रुजू करून घेतले नाही.

ठळक मुद्देन्यायालय आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राचीही दखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढते आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. सोमवारी माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या समायोजनाच्या स्थळी अतिरिक्त ठरलेले एक शिक्षक आढळून आले. २०१७-१८ च्या संचमान्यतेत ते अतिरिक्त ठरले होते. त्यांचे समायोजन न झाल्याने आठ महिन्यापासून वेतनाविना आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी संस्थेला त्यांना रुजू करून घेण्यासाठी पत्र दिले. पण मुख्याध्यापकांनी त्यांना रुजू करून घेतले नाही.वैभव चिमणकर असे शिक्षकाचे नाव आहे. २००२ पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सुरुवातीला ते शिक्षक सहकारी हायस्कूल कामठी येथे कार्यरत होते. तेथे ते अतिरिक्त ठरल्याने २०१५ मध्ये त्यांचे समायोजन रेशीमबाग येथील जामदार हायस्कूलमध्ये झाले. २०१७-१८ यावर्षी झालेल्या संचमान्यतेनुसार ते जामदार शाळेतून अतिरिक्त ठरले. २६ नोव्हेंबर २०१८ ला समायोजनाच्या प्रक्रियेदरम्यान त्यांचे संत ज्ञानेश्वर विद्यालय, महादुला येथे समायोजन करण्यात आले. दरम्यान, समायोजनाच्या दिवशीच त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच ४ डिसेंबर २०१८ ला त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर जामदार शाळेने त्यांना कार्यमुक्त केल्याचे पत्र दिले. संत ज्ञानेश्वर विद्यालयाने याच दिवशी शिक्षण विभागाला जागा रिक्त नसल्याचे पत्र पाठविले, असे चिमणकर सांगतात.त्यामुळे वैभव चिमणकर शिक्षणाधिकाऱ्यांना भेटले. शिक्षणाधिकाऱ्यांनी जामदार हायस्कूलला पत्र पाठवून चिमणकर यांना त्यांचे वेतन काढण्याचे आदेश दिले. दुसऱ्यांदा परत शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला पत्र दिले. तरीसुद्धा त्यांना सामावून घेतले नाही आणि वेतनही काढले नाही. अखेर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ३ जुलै २०१९ ला शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिला. त्याआधारे शिक्षणाधिकाऱ्यांनी २२ जुलै २०१९ ला परत शाळेला रुजू करून घेऊन वेतन काढण्याचे पत्र दिले. मात्र तरीही चिमणकर यांना सामावून घेतले नाही.न्यायालयाच्या आदेशानंतरही रुजू केले नाहीचिमणकर यांचा आरोप आहे की, ते २३ जुलै २०१९ ला शाळेत गेले असता मुख्याध्यापकांनी त्यांना रुजू करण्यास टाळाटाळ केली. शाळेचे मुख्याध्यापक विनय निमगावकर म्हणाले की, तुम्हाला कार्यमुक्त केले असल्यामुळे रुजू करून घेण्याचा प्रश्नच नाही. शिक्षणाधिकारी शाळेचे वेतन अनुदान थांबवतील, त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. माझे वकील पुढील कार्यवाही पाहतील, असे सागून त्यांना रुजू करून घेण्यास स्पष्ट नकार दिला.न्यायालयाने त्यांना रुजू करून घेण्यासंदर्भात म्हटले नाहीयासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक विनय निमगावकर यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, ३ डिसेंबरपर्यंत मी चिमणकर यांचे वेतन काढले. त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर ते दुसºया शाळेत गेलेच नाही. संबंधित मुख्याध्यापकांचे तसे पत्र आहे. नियमानुसार त्यांनी शाळेला काहीच कळविले नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी दोनवेळा त्यांचे वेतन काढण्यासंदर्भात पत्र पाठविले. त्याचे उत्तर मी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. ३ जुलैला न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राला मी न्यायालयात आव्हान देणार आहे. मी न्यायालयाच्या अधीन आहे. न्यायालय चिमणकर यांच्याबाबतीत जो निर्णय देईल तो मला मान्य आहे. ३ जुलैचा न्यायालयाच्या आदेशात रुजू करून घेण्यासंदर्भात उल्लेख नाही.

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर