शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
4
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
5
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
6
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
8
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
9
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
10
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
11
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
12
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
13
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
14
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
15
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
16
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
17
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
18
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
19
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
20
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

बाहेरचे कर्मचारी सांभाळताहेत नागपूर शहरातील वीज वितरण व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:49 PM

९ सप्टेंबरपासून महावितरणने पूर्ण शहरातील वीज वितरण यंत्रणा आपल्या हाती घेतली आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी नागपुरात स्थायिक नाहीत. सर्वांना प्रतिनियुक्तीवर शहरात आणण्यात आले आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यापासून एमपीआर अडकून : कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएल गेल्यानंतर ९ सप्टेंबरपासून महावितरणने पूर्ण शहरातील वीज वितरण यंत्रणा आपल्या हाती घेतली आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी नागपुरात स्थायिक नाहीत. सर्वांना प्रतिनियुक्तीवर शहरात आणण्यात आले आहे. एकीकडे कर्मचारी स्थायी नियुक्तीची मागणी करीत आहेत तर दुसरीकडे महावितरण गेल्या सहा महिन्यापासून एमपीआर (मॅनपॉवर रिव्ह्यू) ला मंजुरी देत नाही.महावितरणने एक महिन्यापर्यंत एसएनडीएलसोबत महाल, गांधीबाग आणि सिव्हील लाईन्स डिव्हीजनमध्ये समानांतर कामकाज केले. ९ ऑक्टोबर रोजी स्वतंत्रपणे कामकाज आपल्या ताब्यात घेतले. या एक महिन्यात कंपनीला सर्व ठिकाणी कर्मचारी नियुक्त करावयाचे होते. कंपनीने घाईगडबडीत नागपूरच्या बाहेर कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर नागपुरात बोलावले. सहा महिने लोटल्यानंतर यापैकी कुणीही स्थायी होऊ शकले नाही. एमपीआरलाही मंजुरी मिळाली नाही. महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी २४ फेब्रुवारी रोजी मुख्यालयाला पत्र पाठवून कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती व स्वीकृत पदावर कर्मचारी देण्याची मागणी केली आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, एसएनडीएलच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. आज त्यांची संख्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक आहे.एसएनडीएलच्या काळापासूनच कर्मचाऱ्यांची संख्या कमीएसएनडीएलच्या काळात त्यांच्या गांधीबाग, महाल व सिव्हील लाईन्स डिव्हीजनमध्ये एकूण ११०० लोकांचा स्टाफ होता. आता केवळ ७६३ कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. एकूण १०७३ पदे मंजुर आहेत. नियुक्त कर्मचाऱ्यांमध्येही महावितरणचे २३७ कर्मचारी आहेत. उर्वरित ५२५ आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून काम करीत आहेत. प्रस्तावित पुनर्गठनमध्ये २५७ कर्मचारी आणखी कमी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना हटवले जाण्याची भीती कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे.थकीत वसुलीसाठी मनुष्यबळाची गरजमहावितरणचे म्हणणे आहे की, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे केवळ २५ हजारावर थकबाकीदारांपर्यंतच पोहोचता येऊ शकत आहे. ऑक्टोबरमध्ये ९७ टक्के, डिसेंबर ९४ टक्के आणि जानेवारीमध्ये १०० टक्के वसुली झाली. यात जुनी थकबाकी कमी आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे थकीत वसुली प्रभावित होत आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर