लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बीटी बियाण्यांमुळे सन २००४-०५ पासून भारतातील कापसाचे उत्पादन वाढायला सुरुवात झाली. २००५-०६ पर्यंत कापसाचा आयातदार असलेला भारत २००७-०८ पासून निर्यातदार झाला. सन २०२३-२४ मध्ये भारताने सर्वाधिक म्हणजे ११८.८१ लाख गाठी कापूस निर्यात केला. सन २०२२-२३ पासून कापसाची निर्यात कमी व आयात वाढत आहे. सरकारी धोरणांमुळे कापसाला खर्च भरून निघेल एवढाही दर मिळत नसल्याने पेरणी क्षेत्र व उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे.
सुरुवातीला देशात कापसाचे पेरणी क्षेत्र सरासरी ४४ ते ६५ लाख हेक्टर होते, ते सन १९९० च्या दशकात ८५ लाख, २००० च्या दशकात १०० लाख तर सन २०१० नंतर १२५ ते १३४.७७ लाख हेक्टरपर्यंत कापसाचे पेरणी क्षेत्र वाढत गेले. हेक्टरवर कापसाची पेरणी केली जायची. सन १९७० पर्यंत कापसाचे सरळवाण तर त्यानंतर हायब्रीड तसेच २००२ पासून हायब्रीड बीटी वाण वापरायला सुरुवात झाली. पेरणी क्षेत्रासोबत देशातील कापसाचे उत्पादनही वाढत गेले.
सन १९४७ ते १९७० पर्यंत देशातील कापसाचे उत्पादन ४४.२४ ते ५६.६४ लाख गाठींपर्यंत होते. १९८० व १९९० या तीन दशकात ते ७८ ते ११७लाख गाठी आणि बीटी वाण आल्यानंतर १४० लाखांवरून ३९० लाख गाठींपर्यंत पोहोचले. पेरणी क्षेत्र वाढायला दर आणि उत्पादन वाढायला बीटी वाण कारणीभूत ठरले.
२००४-०५ पर्यंत भारताची कापूस आयात ही निर्यातीपेक्षा अधिक होती. या काळात सरासरी १२ ते २२ लाख गाठी कापसाची आयात तर ०.६० ते ९.१४ लाख गाठींची निर्यात केली जायची. २००७-०८ नंतर कापसाच्या निर्यातीत आमूलाग्र वाढ होऊन आयात ही ६.३८ ते २०.४० लाख गाठींच्या दरम्यान राहिली. २०२४-२५ पासून कापसाची आयात ४१ ते ५० लाख गाठींवर पोहोचली असून, निर्यात मात्र १८ लाख गाठींपर्यंत खाली आली आहे.
सर्वाधिक आयात व निर्यात
कापसाची सर्वाधिक ५० लाख गाठी कापसाची आयात २०२५-२६ मध्ये करण्यात आली असून, त्यात सप्टेंबरपर्यंत आणखी वाढ होणार आहे. २०१३-१४ मध्ये सर्वाधिक ११८.८१ लाख गाठींची निर्यात करण्यात आली असून, यातील ६५ टक्के कापूस चीनने खरेदी केला होता.अमेरिकेसोबतचे ट्रेड डील, २ शुल्कमुक्त आयात, वाढता खर्च, मिळणारा कमी दर व बियाण्यांच्या खालावलेल्या गुणवत्तेचा कापसाची आयात-निर्यात व उत्पादनावर परिणाम होत आहे.
कापसाचा असा आहे लेखाजोखावर्ष उत्पादन आयात निर्यात (लाख गाठी)१९४७ ते १९६० ३३.३६ ते ६०.१२ - -१९६० ते १९८० ५६.६४ ते ७८.०० - -१९८० ते २००० ८०.०० ते १४०,०० - -२००० ते २०१० १४०.०० ते ३०५.०० २.३८ ते २२.१३ ०.६० ते ८८.५०२०१० ते २०२० ३३९.०० ते ३६५.०० २.३८ ते ३०.९४ ७६.५० ते ११८.८१२०२० ते २०२५ ३५२.४८ ते ३३३.२५ ११.०३ ते २०.४० १५.८९ ते ७७.५९
Web Summary : India's cotton story reverses. Once an exporter, government policies now push India towards increased cotton imports, impacting production and farmer income. BT cotton initially boosted yields, but changing trade dynamics are reshaping the industry.
Web Summary : भारत की कपास कहानी उलट गई। कभी निर्यातक, सरकारी नीतियाँ अब भारत को कपास के बढ़ते आयात की ओर धकेल रही हैं, जिससे उत्पादन और किसान की आय प्रभावित हो रही है। बीटी कपास ने शुरू में उपज बढ़ाई, लेकिन बदलते व्यापार गतिशीलता उद्योग को नया रूप दे रही है।