उमरेड (नागपूर) : उमरेड एमआयडीसीतील एमएमपी इंडस्ट्रीज लि. कंपनीमध्ये शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कंपनी प्रशासनावर गुन्हा नोंदविण्यात आला. मृतांच्या कुटुंबास ६०, तर जखमींना ३० लाखांची मदत दिली जाईल, असे महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्फोट झाला तेव्हा गंभीर अवस्थेत वेदनांचा आकांत घेऊन ८ कामगार होरपळत बाहेर पडले, तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कंपनीतील मिक्सर युनिटमध्ये झाली असून यावेळी तब्बल ८७ कामगार कर्तव्यावर होते.
पॉलिसिंग ट्यूब (पीटी) बॉक्स लीक असल्याने स्फोट झाल्याचा कामगारांचा आरोप आहे. काहींनी याबाबत वरिष्ठांना अवगत केले. तरीही काम सुरू ठेवण्यात आले. कंपनी प्रशासनाने मात्र चौकशीनंतर या स्फोटाचे कारण सांगता येईल, असे स्पष्ट केले आहे.