रायडरचे शोषण करीत आहे झोमॅटो : शिवसेना उतरली रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:56 IST2019-06-17T23:54:22+5:302019-06-17T23:56:54+5:30
ऑनलाईन फूड डिलेव्हरी कंपनी झोमॅटोचे फूड डिलेव्हरी करणाऱ्या (रायडर) मुलांनी कंपनीवर शोषण करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी संविधान चौकात निदर्शने केली. शिवसेनेच्या बॅनर अंतर्गत करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कंपनी नियमात बदल करून मुलांचे शोषण करीत असल्याचा आरोप करण्यात आला.

रायडरचे शोषण करीत आहे झोमॅटो : शिवसेना उतरली रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑनलाईन फूड डिलेव्हरी कंपनी झोमॅटोचे फूड डिलेव्हरी करणाऱ्या (रायडर) मुलांनी कंपनीवर शोषण करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी संविधान चौकात निदर्शने केली. शिवसेनेच्या बॅनर अंतर्गत करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कंपनी नियमात बदल करून मुलांचे शोषण करीत असल्याचा आरोप करण्यात आला.
कंपनीने नियमात बदल केल्याच्या विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर समन्वयक नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात शेकडो रायडरनी सोमवारी संविधान चौकात धरणे दिले. पक्षाचे शहर प्रमुख राजू तुमसरे हे उपस्थित होते. तिवारी यांनी सांगितले की, २४ तासात समस्या सुटली नाही तर डिलिव्हरी बंद केली जाईल. पक्षाच्या शिष्टमंडळाने वाहतूक विभागाचे उपायुक्त गजानन राजमाने यांची भेट घेऊन त्यांचेशी चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने सांगितले की, रायडर कामासाठी ज्या मोटरसायकलचा वापर करतात त्याचे रजिस्ट्रेशन कमर्शियल वाहन म्हणून व्हावे.
आंदोलनात मुन्ना तिवारी, अब्बास अली, आशिष हाडगे, अभिषेश दुर्वे, चिंटू महाराज, गुड्डू रहांगडाले, राजा रामतवार, योगेश न्यायखोर, रूपेश बागड, छगन सोनवणे, अक्षय मेश्राम, राम कुकडे, आशिष देशमुख, रवी चुरांगले, सोनू तिवारी, प्रवीण शर्मा, कमल पल्लेवार, सुनील बॅनर्जी, मनोज साहू, गणेश सालंकी, रवी सिर्सीकर, ललित बावनकर, दीपक यादव, गौरव साहू, महेश महाड़िक, संजोग राठोड, दीपक पोहनकर आदींचा समावेश होता.
नियमात कोणते बदल केले
रायडरला फूड डिलेव्हरीचे कमिशन दिले जाते. टार्गेट पूर्ण केल्यावर इन्सेंटिव्ह दिले जाते. पूर्वी हे टार्गेट सोमवारपासून गुरुवारपर्यंत प्रति दिन १६ ऑर्डर इतके होते. ते पूर्ण करणाऱ्यांना ५२५ रुपयाचे इन्सेंटिव्ह दिले जात होते. प्रत्येक ऑर्डरवर ४० रुपये कमिशन मिळायचे. या कामासाठी रायडरला स्वत:च्या मोटारसायकलचा वापर करायचा होता. पेट्रोल खर्च ही स्वत:लाच उचलायचा होता. टी-शर्ट व फूड कॅरिबॅगसाठी १५०० रुपये द्यावे लागतात. कंपनीने नुकतेच नियमात बदल करीत इन्सेंटिव्हसाठी टार्गेट वाढवून २० ते २२ ऑर्डर असे केले आहे. रायडरनुसार सोमवार ते गुरुवारपर्यंत दररोज २० व शनिवारी -रविवारी २२-२२ ऑर्डर करायचे आहे. हे शक्य नाही. कारण एक ऑर्डर पूर्ण करण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतात. डिलेव्हरीचे अंतरही १० किमीवरून १५ किमी करण्यात आले आहे. यात पेट्रोलचा खर्च आणखी वाढणार आहे. सलग २४ तास काम केले तरीही त्यांना इन्सेंटिव्ह मिळू शकणार नाही, असे या मुलांचे म्हणणे आहे.