Corona Virus in Nagpur; नागपूरच्या वाडी परिसरात सोशल डिस्टन्सिंगचा आगळावेगळा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:38 PM2020-04-09T12:38:16+5:302020-04-09T12:38:45+5:30

कोरोनाच्या धास्तीपायी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे गांभीर्य नागरिकांच्या पुरेसे लक्षात आले आहे. याचा प्रत्यय नागपुरातील वाडी भागातून फिरताना दिसतो.

experiment of social distance in Wadi area of Nagpur | Corona Virus in Nagpur; नागपूरच्या वाडी परिसरात सोशल डिस्टन्सिंगचा आगळावेगळा प्रयोग

Corona Virus in Nagpur; नागपूरच्या वाडी परिसरात सोशल डिस्टन्सिंगचा आगळावेगळा प्रयोग

Next
ठळक मुद्देगुरुद्वारातील लंगरमधून दररोज शेकडो टिफिन्स दिले जातात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोनाच्या धास्तीपायी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे गांभीर्य नागरिकांच्या पुरेसे लक्षात आले आहे. याचा प्रत्यय नागपुरातील वाडी भागातून फिरताना दिसतो. रस्त्याच्या कडेला ठराविक अंतरावर ठेवलेले टिफिन डब्बे पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेतात. यामागे कारण असे की, येथील गुरुद्वारातर्फे गरजूंना मोफत भोजन वितरित केले जाते. हे भोजन घेऊन जाण्यासाठी येथील नागरिक व कार्यकर्त्यांनी आगळीवेगळी योजना आखली. त्यांनी नागरिकांनी घरून आणलेले डबे रस्त्याच्या कडेला एका रांगेत ठराविक अंतरावर ठेवले. हे डबे लंगरमधील कार्यकर्ते घेऊन जातात व भरून आणून पुन्हा त्याच जागी ठेवून देतात. संबंधित डबा ज्याचा असेल तो आपला डबा मग घेऊन जातो. या पद्धतीने शेकडो गरजूंना पुरेसे अन्न कुठल्याही गोंधळाविना मिळते आहे. तसेच लंगर चालवणाºया कार्यकर्त्यांनाही कुठला संसर्गाचा धोका उरलेला नाही.


 

Web Title: experiment of social distance in Wadi area of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.