वायुसेनेच्या संग्रहालयात घ्या मिसाइलचा अनुभव; काय-काय पाहता येईल? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 08:55 IST2025-04-26T08:54:34+5:302025-04-26T08:55:10+5:30

भारतीय वायुसेनेतील आतापर्यंतच्या सर्व फायटर जेट विमानांची माहिती संग्रहालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Experience missiles at the Air Force Museum at Nagpur; What can you see? | वायुसेनेच्या संग्रहालयात घ्या मिसाइलचा अनुभव; काय-काय पाहता येईल? 

वायुसेनेच्या संग्रहालयात घ्या मिसाइलचा अनुभव; काय-काय पाहता येईल? 

नागपूर - आजपर्यंत झालेल्या युद्धांमध्ये भारतीय वायुसेनेने चित्तथरारक कारवाया करून भारताचा तिरंगा फडकवला. या कामगिरीची माहिती लहान मुले, तरुण आणि नागरिकांना व्हावी, या हेतूने भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडने वायुसेनानगरमध्ये भव्य वायुसेना संग्रहालय उभारले आहे. शुक्रवारी एअर मार्शल विजय कुमार गर्ग, एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ, मेंटेनन्स कमांड यांच्या हस्ते या संग्रहालयाचा शुभारंभ झाला. मध्य भारतातील हे पहिले संग्रहालय शनिवारपासून नागरिकांना पाहण्यासाठी खुले होणार आहे. 

संग्रहालयात आल्यावर काय पाहता येईल? 
विविध प्रकारची विमाने, हेलिकॉप्टर आणि मिसाईल्सची मॉडेल्स प्रदर्शित करण्यात आली आहेत. या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर वायुसेनेच्या आजवरच्या प्रगतीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेता येईल. येथे लढाऊ विमाने आणि उपकरणांसोबत वायुसेनेतील वीर सैनिकांचे फोटो लावून कामगिरीचा आढावा घेतला आहे. 

मंगळवारी बंद राहील
हे संग्रहालय मंगळवारी बंद राहणार आहे. इतर दिवशी  सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहील, अशी माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी ग्रुप कॅप्टन रत्नाकर सिंह यांनी दिली.

विशेष खोलीची व्यवस्था 
भारतीय वायुसेनेतील आतापर्यंतच्या सर्व फायटर जेट विमानांची माहिती संग्रहालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे येथे लावण्यात आलेल्या सिम्युलेटरच्या माध्यमातून तरुण, नागरिकांना फायटर जेट उडवण्याचा व या फायटर जेटच्या माध्यमातून शत्रूंवर मिसाईलने हल्ला करण्याचा अनुभव मिळणार आहे. 

Web Title: Experience missiles at the Air Force Museum at Nagpur; What can you see?