परिवहन विभागाचा विस्तार करणार
By Admin | Updated: January 22, 2015 03:01 IST2015-01-22T03:01:01+5:302015-01-22T03:01:01+5:30
महापालिके च्या नवीन कायद्यानुसार परिवहन विभागाला विशेष दर्जा मिळाला आहे. परंतु कामकाज विविध विभागामार्फत केले जात असून यात सध्या अस्थायी कर्मचारी आहेत.

परिवहन विभागाचा विस्तार करणार
नागपूर : महापालिके च्या नवीन कायद्यानुसार परिवहन विभागाला विशेष दर्जा मिळाला आहे. परंतु कामकाज विविध विभागामार्फत केले जात असून यात सध्या अस्थायी कर्मचारी आहेत. या विभागाचा विस्तार करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी नवीन २९ पदे भरण्याचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय सोमवारी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष बंडू राऊ त यांनी दिली.
परिवहन विभागाचा व्याप मोठा असूनही मनपात यासाठी स्वतंत्र विभाग नाही. त्यामुळे कामकाजात अडचणी येत आहेत. त्या दूर क रून विभागाला सक्षम करण्यासाठी नवीन पदे भरली जाणार आहेत.
स्वतंत्र विभागाची निर्मिती करून कुशल व अकुशल श्रेणीतील पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रशासकीय अधिकारी, अभिलेखापाल, कनिष्ठ अभियंता आॅटोमोबाईल, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, वरिष्ठ लिपीक, अभियांत्रिकी विद्युत सहायक, कनिष्ठ निरीक्षक, कनिष्ठ लिपीक, संगणक आॅपरेटर , परिचारक व वाहन तपासक आदी पदांना मंजुरी देण्यात आली.
नवीन पदे भरण्याला सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. आस्थापना खर्चात याचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला सदस्य प्रशांत धवड, मुरलीधर मेश्राम, श्रावण खापेकर, संदीप सहारे, भूषण शिंगणे, सुमित्रा जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)