शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कंपन्यांमुळे मिहानमध्ये उत्साह

By admin | Updated: August 17, 2016 02:18 IST

गेल्या काही दिवसांपासून देश-विदेशातील कंपन्या मिहान-सेझमध्ये उद्योग उभारण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

 ‘पतंजली’ ने भरले ६.५० कोटी : दुबईतील परफ्युम कंपनीने घेतली जागा नागपूर : गेल्या काही दिवसांपासून देश-विदेशातील कंपन्या मिहान-सेझमध्ये उद्योग उभारण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. फूड पार्कमध्ये ‘पतंजली’ला २३० एकर जागा मिळाल्यानंतर पुन्हा तीन नवीन कंपन्यांनी जागा खरेदी केली आहे. या उत्पादक कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असून त्यामुळे मिहानमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मिहान-सेझमध्ये २०१६ मध्ये छोट्यामोठ्या १२ कंपन्यांनी जागा घेतली आहे. तर मध्यवर्ती इमारतीत आठ आयटी कंपन्या कार्यान्वित झाल्या आहेत. पुन्हा काही आयटी कंपन्यांनी छोट्या जागेची मागणी केली आहे. याशिवाय जुलैमध्ये एसईझेडबाहेर एनडीएसपी स्पाईसेस आणि एसवायएस लॉजिस्टिकने प्रत्येकी एक एकर जागा खरेदी केली आहे. याशिवाय दुबई येथील नामांकित परफ्यूम उत्पादक कंपनीने एसईझेड या निर्यातीत क्षेत्रात २.५ एकर जागा खरेदी केली आहे. वर्षभरात उत्पादन सुरू करण्याचा या कंपनीचा दावा आहे. याशिवाय देशातील नामांकित कंपन्यांनी एसईझेडमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी जागेची विचारण केली आहे. काही प्रस्ताव विचाराधीन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) पतंजलीची जागा ६०.३६ कोटींची तिसऱ्या निविदेत पतजंलीला २६.२५ लाख रुपये एकर दराने एसईझेडबाहेरील फूड पार्कमध्ये २३० एकर अविकसित जागा मिळाली आहे. या जागेची एकूण किंमत ६०.३६ कोटी रुपये आहे. कंपनीला जागा विकसित करून त्यावर उद्योग सुरू करावा लागणार आहे. कंपनीने जागेसाठी प्रारंभी ६.५० कोटी रुपये भरले आहे. पूर्ण पैसे भरल्यानंतर कंपनीला जागेचा ताबा देण्यात येणार आहे. यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आहे. अधिग्रहणानंतर जागेच्या विकासासाठी जवळपास एक वर्ष लागणार आहे. त्यानंतर उद्योगाची उभारणी आणि उत्पादनासाठी पुन्हा एक वर्ष लागेल. अर्थात प्रत्यक्षात उत्पादन निर्मितीसाठी दोन वर्षे लागतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. पण या उद्योगाच्या येण्याने मिहानमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एवढी मोठी जागा घेऊन उत्पादनांची निर्मिती करणारी पतंजली मिहानमधील पहिलीच कंपनी आहे.