खळबळ: नागपुरात पोलीस ठाण्यात मी टू ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:50 IST2019-01-11T00:48:47+5:302019-01-11T00:50:50+5:30

शहराबाहेरच्या एका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. तशी तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे आज संबंधित महिलेने केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Excitement: Me Too in police station at Nagpur ... | खळबळ: नागपुरात पोलीस ठाण्यात मी टू ...

खळबळ: नागपुरात पोलीस ठाण्यात मी टू ...

ठळक मुद्देआयुक्तांकडे तक्रार : एसीपींना चौकशीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराबाहेरच्या एका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. तशी तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे आज संबंधित महिलेने केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दोन महिलांच्या मदतीने संबंधित महिला पोलीस आयुक्तालयात पोहोचली. तिने एका पोलीस निरीक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला. तशी तक्रारही आयुक्तांकडे दिली. आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेत, संबंधित पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सहायक आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. हे वृत्त सर्वत्र पोहोचल्याने एकच खळबळ निर्माण झाली. यासंबंधाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळले आहे.

Web Title: Excitement: Me Too in police station at Nagpur ...