शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

Maharashtra Assembly Election 2019 : युवकांमध्ये उत्साह, मतदार संख्येत वाढ : जनजागृतीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 20:10 IST

तरुणांमध्ये वाढलेली राजकीय जागृती व उत्साह आणि जिल्हा प्रशासनासह विविध राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी राबविलेले विशेष अभियान, यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

ठळक मुद्देप्रशासन व राजकीय पक्षांनीही राबविली विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तरुणांमध्ये वाढलेली राजकीय जागृती व उत्साह आणि जिल्हा प्रशासनासह विविध राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी राबविलेले विशेष अभियान, यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान नागपूर जिल्ह्यातील मतदार यादी मार्च २०१९ मध्ये जारी करण्यात आली होती. तर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने ऑगस्ट २०१९ पर्यंत नोेंदणी असलेल्या मतदारांची यादी जारी केली आहे. या दोन्ही मतदार यादीची तुलना केल्यास जिल्ह्यातील एकूण १२ विधानसभा निवडणुकीमध्ये ८२,०६ मतदार वाढले आहेत. मतदारांची संख्या वाढण्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी मतदार संघ सर्वात पुढे आहे. कामठीतील मतदार संख्या ४,१७,२७७ वरून ४,३८,४१७ इतकी झाली आहे. याचप्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात ९,५७४, दक्षिण नागपूरमध्ये ६,०२८, पूर्व नागपुरात ६,६६२, मध्य नागपुरात ६,९२५, पश्चिम नागपुरात ६,५६६ आणि उत्तर नागपुरात ८,४८३ मतदार लोकसभा निवडणुकीनंतर वाढले आहेत.७३,९३६ नवीन मतदारजिल्ह्यात या कालावधीत १८ ते १९ वयोगटातील ७३,९३६ नवीन मतदारांनी नोंदणी केली. यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष अभियानांतर्गत ही नवीन नोंदणी झाली. यादरम्यान ८,८३८ मतदारांचे नाव हटविण्यात आले. यापैकी ५,७०८ मतदार हे मृत झालेले आहेत, तर १४५३ मतदार हे दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित झालेले आहेत. ८७६ मतदारांची नावे दोन ठिकाणी आढळून आली.तृतीयपंथी झाले कमीएकीकडे एकूण मतदारांची संख्या उल्लेखनीय वाढली असली तरी तृतीयपंथीयांची संख्या मात्र कमी झाल्याचे दिसून येते. मार्च २०१९ मध्ये १०९ मतदार तृतीयपंथी होते. आता ती संख्या १०० वर आली आहे. रामटेकमध्ये पूर्वी आठ तृतीयपंथी मतदार होते. आता एकही नाही. कामठी व पश्चिममध्ये प्रत्येकी एक मतदार कमी झाला. केवळ मध्य नागपुरात आठ तृतीयपंथी होते, ती वाढून ११ वर पोहोचली आहे. सर्वाधिक तृतीयपंथी मतदार उत्तर नागपुरात आहेत. येथे पूर्वीही तितकेच मतदार होते.विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची संख्यामतदार संघ              ऑगस्ट २०१९            मार्च २०१९           वाढ---------------------------------------------------------------काटोल                      २,७१,५१८             २,७०,७४०            ७७८सावनेर                       ३,१०,५८१             ३,०३,०८१             ७,५००हिंगणा                        ३,७५,९२४            ३,६८,७५५          ७१६९उमरेड                       २,८४,४०३             २,८३,३३१            १०७२कामठी                      ४,३८,४१७             ४,१७,२७७          २१,१४०रामटेक                     २,७८,०६९             २,७७,८९०          १७९दक्षिण-पश्चिम            ३,८३,३८७              ३,७३,८१३           ९५७४दक्षिण नागपूर            ३,८१,७४७             ३,७५,७१९          ६०२८पूर्व नागपूर                ३,७०,८८२              ३,६४,२२०           ६६६२मध्य नागपूर              ३,२३,९५७              ३,१७,०३२           ६९२५पश्चिम नागपूर            ३,६०,८१९               ३,५४,२५३           ६५६६उत्तर नागपूर             ३,८३,६६३              ३,७५,१८०             ८४८३-----------------------------------------------------------------एकूण                    ४१,६३,३६७          ४०,८१,२९१        ८२,०७६

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpurनागपूर