शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणारी गजाआड; अनेकांचे दणाणले धाबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:12 IST

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणारी शीला ऊर्फ प्रमिला कोहाड अखेर गजाआड झाली.

ठळक मुद्देस्वत:च्या बचावासाठी केला पोलिसांचा वापर

आॅनलाईन लोकमतनागपूर : हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणारी शीला ऊर्फ प्रमिला कोहाड अखेर गजाआड झाली. सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेत पोलिसांसोबत उठबस करणाऱ्या या महिलेचा बुरखा फाटल्यामुळे तिच्या संपर्कातील पोलिसांसकट अनेकांचे धाबे दणाणले आहे.शीला गेल्या १५ वर्षांपासून देहविक्रयाच्या गोरखधंद्यात सक्रिय होती. मध्यभारतात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणारा कुख्यात सचिन सोनारकर, गोंदियाचा अमी चव्हाण, शीतल गदियासह ठिकठिकाणच्या दलालांच्या संपर्कात होती. शीला नागपूर-विदर्भातील ठिकठिकाणच्या आंबटशौकिनांना सेक्सवर्कर उपलब्ध करून देत होती. शहरातील विशिष्ट हॉटेल आणि फार्महाऊसमध्ये आयोजित पार्ट्यातही ती दिल्ली, मुंबई, लखनौसह ठिकठिकाणच्या वारांगणा उपलब्ध करून देत होती. या गोरखधंद्यात गुंतलेल्या शीलाने स्वत:च्या बचावासाठी चक्क पोलिसांचाच वापर चालविला होता. ती प्रतिस्पर्धी दलालांच्या आणि वेश्याव्यवसायात गुंतलेल्या महिलांच्या पॉश अड्ड्यांची माहिती देऊन पोलिसांचे छापे घालवून घेत होती. नंतर काही पोलिसांना त्या दलालांकडून मोठी रक्कमही मिळवून देत होती. त्यामुळे पोलीस तिच्यासोबत ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून वागत होते. शीलाचे नागपुरातील अनेक ठिकाणी कुंटणखाने होते. त्यापैकी बेसा येथील कुंटणखान्यावर दीड महिन्यापूर्वी पोलिसांनी छापा घातला. तेथे पकडल्या गेलेल्या वारांगनांनी शीला कोहाड ही पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांमध्येही खळबळ उडाली.अनेकांनी झटकले हातकुंटणखान्यावर छापा पडताच शीला फरार झाली. ती दीड महिना फरार होती. या दरम्यान तिने तिच्यासोबत संबंध असलेल्या पोलिसांसकट अनेकांशी संपर्क करून स्वत:ला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र, साऱ्यांनीच हात झटकले. ती सुगतनगरातील सदनिकेत लपून असल्याची माहिती मंगळवारी हुडकेश्वर पोलिसांना मिळाली. पोलीस तिला अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्याने माहिती देणाऱ्यांनी वरिष्ठांकडे ती माहिती पोहचविण्याचे संकेत दिले. त्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी धावपळ करीत तिला रात्री अटक केली.डायरी गुलदस्त्याततिच्या जवळून पोलिसांनी मोबाईल आणि मोठी डायरी जप्त केल्याचे समजते. या डायरीत आणि मोबाईलमध्ये ठिकठिकाणच्या वारांगना, दलाल अन् ग्राहकांसोबत काही पोलिसांचीही नावे आणि नंबर होते, असे सांगितले जाते. त्यामुळे पोलिसांनी त्याबाबत वाच्यता करण्याचे टाळून बुधवारी तिला कोर्टात हजर केले. कोर्टाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे संबंधितांचा जीव भांड्यात पडला. वरिष्ठांनी त्या डायरी अन् मोबाईलमधील नावांची चौकशी केल्यास शहरातील अनेकांची बुरखे फाटू शकतात, असे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे.

 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिस