शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

ईव्हीएम सुरक्षितच, रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीवर परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 10:46 PM

उमरेड येथील विधानसभा मतदार संघासाठी तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेले स्ट्राँग रुम पोलिसांच्या सुरक्षिततेत होते. केवळ स्ट्राँग रुमच्या बाहेर पोलीस सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या गार्ड रुममधील दोन एलसीडी टीव्ही व डीव्हीआर गहाळ झाले आहे. परंतु स्ट्राँग रुममधील व्हीडिओ चित्रीकरणाचे कव्हरेज सहायक निवडणूक अधिकारी यांच्या सेफ कस्टडीमध्ये असून या प्रकरणाची ग्रामीण पोलीस चौकशी करीत आहे. ही घटना ईव्हीएम मशीन कळमन्यात पोहोचल्यानंतर झाली आहे. सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कळमन्यातील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित आहेत. त्यामुळे या घटनेमुळे रामटेक लोकसभा मतदार संघातील मतमोजणीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक लोकसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड येथील विधानसभा मतदार संघासाठी तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेले स्ट्राँग रुम पोलिसांच्या सुरक्षिततेत होते. केवळ स्ट्राँग रुमच्या बाहेर पोलीस सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या गार्ड रुममधील दोन एलसीडी टीव्ही व डीव्हीआर गहाळ झाले आहे. परंतु स्ट्राँग रुममधील व्हीडिओ चित्रीकरणाचे कव्हरेज सहायक निवडणूक अधिकारी यांच्या सेफ कस्टडीमध्ये असून या प्रकरणाची ग्रामीण पोलीस चौकशी करीत आहे. ही घटना ईव्हीएम मशीन कळमन्यात पोहोचल्यानंतर झाली आहे. सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कळमन्यातील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित आहेत. त्यामुळे या घटनेमुळे रामटेक लोकसभा मतदार संघातील मतमोजणीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक लोकसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांनी स्पष्ट केले.उमरेड येथील डीव्हीआर चोरी प्रकरणाच्या घटनेबाबत पत्रकारांनी फडके यांना विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. फडके यांनी सांगितले की, रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघाकरिता शासकीय तंत्र माध्यमिक शाळाद्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सेव रोड, गोटेखणी उमरेड येथे मतदानासाठी प्रत्येक केंद्रांवर ईव्हीएम पोहोचवण्याच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरुपात स्ट्राँग रुम तयार करण्यात आली होती. ती पोलीस नियंत्रणाखाली होती. रामटेक लोकसभेसाठी मिळालेल्या ईव्हीएम मशीन या स्ट्राँग रुममध्ये २६ मार्च २०१९ पासून ठेवणयात आल्या होत्या. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा व पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. ११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. १२ एप्रिल रोजी पोलेड ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅटसह संविधानिक लिफाफे असलेल्या ट्रंक्स कळमना मार्केट येथील स्ट्राँग रुममध्ये दुपारी जमा करण्यात आल्या. त्याचवेळी रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट कळमन्यातील स्ट्राँग रुममध्ये त्याच दिवशी (१२ एप्रिल रोजी )जमा करण्यात आल्या. स्ट्राँग रुम सील करतांना सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य पोलीस दल व स्थानिक पोलीस अशा त्रिस्तरीय निगराणीमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ठेवण्यात आल्या. त्यामुळे उमरेड येथील स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम अथवा व्हीव्हीपॅट मशीन नव्हते.दरम्यान उमरेड येथील तात्पुरते तयार करण्यात आलेले स्ट्राँग रुम पोलिसांच्या सुरक्षिततेत होते. स्ट्राँग रूमबाहेर पोलीस सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या गार्ड रुममधील दोन एलसीडी टीव्ही व डीव्हीआर गहाळ झाल्याची बाब १५ एप्रिल २०१९ रोजी उमरेडच्या सहायक निवडणूक अधिकाऱ्याच्या निदर्शनास आली असता तात्काळ संबंधित स्थानिक पोलीस अधिकाऱ्याला कळविण्यात आले. तथापी स्ट्राँग रुममधील व्हिडिओ चित्रीकरणाचे कवरेज सहायक निवडणूक अधिकारी यांच्या सेफ कस्टडीमध्ये असल्याचे फडके यांनी स्पष्ट केले.चौकशी सुरू,कारवाई होईलदरम्यान या प्रकरणाची चौकशी ग्रामीण पोलीस करीत आहे. सखोल चौकशी झाल्यावर जो कुणी दोषी आढळून येईल, त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असेही अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक लोकसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकramtek-pcरामटेकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019