शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाला स्वतःचे अस्तित्व निवडण्याचे स्वातंत्र्य हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 21:01 IST

Nagpur News स्वतःचे अस्तित्व निवडण्याचे स्वातंत्र्य समाजाने प्रत्येक व्यक्तीस द्यावे.  जेणेकरून समाजात कोणासही मन मारून जगावे लागणार नाही. असे झाल्यास समाजास  खरे व्यक्ती स्वातंत्र्य मिळेल, असे प्रतिपादन किन्नर समूह कार्यकर्त्या व नृत्यांगना मोहिनी यांनी केले.

अभिवृत्तिप्रमाणे स्त्री, पुरुष अथवा थर्ड जेंडर म्हणूनही स्वतःचे अस्तित्व निवडण्याचे स्वातंत्र्य समाजाने प्रत्येक व्यक्तीस द्यावे.  जेणेकरून समाजात कोणासही मन मारून जगावे लागणार नाही. असे झाल्यास समाजास  खरे व्यक्ती स्वातंत्र्य मिळेल, असे प्रतिपादन सारथी संस्थेच्या किन्नर समूह कार्यकर्त्या व नृत्यांगना मोहिनी यांनी केले.

नागपुरात प्रथमच सुरू  झालेल्या  ‘रूबरू’ ह्युमन लायब्ररीच्या दुसऱ्या सत्रात त्या बोलत होत्या. परांजपे विद्यालय बजाज नगर येथे झालेल्या  ह्यूमन लायब्ररीच्या दुसऱ्या सत्रात थर्ड जेंडर असलेल्या मोहिनीने  'मी मोहित नाही मोहिनी आहे' आणि प्रवास करताना स्त्री म्हणून आलेल्या विचित्र अनुभवांना  भिडलेल्या लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या भावना खरे यांनी 'ही चेन ओढायलाच हवी' ही पुस्तके वाचक श्रोत्यांपुढे मांडलीत. 

खूप मोठ्या प्रमाणात वाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या  'रूबरू ह्यूमन लायब्ररी' चे हे दुसरे सत्र होते. दर महिन्यात विविध व्यक्ती संवादाद्वारे आपल्या आयुष्याचे पुस्तक या उपक्रमाद्वारे सांगत आहेत.  

यावेळी मोहिनीने अगदी बालवयापासून तिच्या पुरुष असलेल्या शरीरात दडलेल्या स्त्रीत्वाचा प्रवास मांडला. या प्रवासात अगदी लहान वयात आलेले शोषणाचे अनुभव, अपमानाचे प्रसंग आणि मानसिक घालमेल मांडले. तसेच समाजाचे कलुषित विचार व वागणूक यावर टीका केली.  आता तरी जगाने मानसिकता बदलायला हवी आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्यायला हवे असेही अंगावर रोमांच उभे करणारे मनोगत व्यक्त केले.

'ती चेन ओढायलाच हवी' हे पुस्तक मांडताना भावना खरे यांनी प्रवास करताना आलेले विदारक अनुभव तर मांडलेच परंतु संघर्षाद्वारे एक स्त्री कसा न्याय मिळवून घेऊ शकते, हे त्यांच्या प्रवासाने उलगडून दिले. त्यांचे अनुभव ऐकताना अनेक वाचक श्रोत्यांनी प्रेरणा मिळाल्याचे सांगत हे अनुभव आम्हालाही अशा प्रसंगात बळ देतील असे म्हटले.या उपक्रमास रुबरू ह्युमन लायब्ररीची टीम यासह कार्यकारी अध्यक्ष डॉ स्वाती धर्माधिकारी सचिव वर्षा बाशू कोषाध्यक्ष अडवोकेट क्षितिज धर्माधिकारी  उपस्थित होते

टॅग्स :LGBTएलजीबीटी