भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वांचा सहभाग आवश्यक
By Admin | Updated: August 1, 2015 04:01 IST2015-08-01T04:01:36+5:302015-08-01T04:01:36+5:30
लाच देणे घेणे बंद झाले तर विचार करा सर्व सरकारी कार्यालयात कामे होण्याचे प्रमाण वाढेल.

भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वांचा सहभाग आवश्यक
राजीवकुमार जैन : मेडिकलमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध कार्यशाळा
नागपूर : लाच देणे घेणे बंद झाले तर विचार करा सर्व सरकारी कार्यालयात कामे होण्याचे प्रमाण वाढेल. प्रत्येक कर्मचारी शिपायापासून तर साहेबापर्यंत काम करताना दिसेल. प्रत्येक सरकारी योजनेचे उदिष्ट १०० टक्के पूर्ण होईल. यासाठी आपणा सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजीवकुमार जैन यांनी येथे केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भ्रष्टाचाराविरुद्ध अभियान राबविणे व जनजागृतीवर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. मंचावर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मुख्य मुख्य प्रशासकीय अधिकारी परशुराम दोरवे उपस्थित होते.
जैन म्हणाले, भ्रष्टाचाराची कीड एवढी फोफावली आहे की, याला आळा घालायचा असेल तर लाच देण्याची प्रकिया थांबविली पाहिजे. यावेळी जैन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे प्रबोधन केले. डॉ. निसवाडे यांनी विद्यार्थ्यांना भ्रष्टाचाराच्याविरोधात समोर येण्याचे आवाहन केले. संचालन दोरवे यांनी केले. कार्यशाळेत मोठ्या संख्येत एमबीबीएसचे विद्यार्थी, परिचारिका उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)