डॉक्टरांच्या गीतांनी रंगली सायंकाळ
By Admin | Updated: January 20, 2015 01:18 IST2015-01-20T01:18:46+5:302015-01-20T01:18:46+5:30
रविवारची सायंकाळ डॉक्टरांच्या गीताने रंगली. रागांवर आधारित बॉलिवूड गीतांच्या ‘आवाज की दुनिया’ या कार्यक्रमात तब्बल ३५ डॉक्टरांनी गीत सादर केले. इंडियन मेडिकल असोसिएशन

डॉक्टरांच्या गीतांनी रंगली सायंकाळ
आयएमएचा उपक्रम : ३५ डॉक्टरांनी सादर केली गाणी
नागूपर : रविवारची सायंकाळ डॉक्टरांच्या गीताने रंगली. रागांवर आधारित बॉलिवूड गीतांच्या ‘आवाज की दुनिया’ या कार्यक्रमात तब्बल ३५ डॉक्टरांनी गीत सादर केले. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्यावतीने या मेगा म्युझिकल उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमएच्या सभागृहात या कार्यक्रमाला डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. शरद रानडे आणि डॉ. मेघा बालंखे यांच्या ‘बाजे रे मुरलिया बाजे’ या गीताने झाली. त्यानंतर एकापेक्षा एक सरस गीत सादर करण्यात आली. ‘दिल है की मानता नही’ हे गीत डॉ. सुशील गावंडे व डॉ. अंजली भांडारकर यांनी गायले. ‘दो दिवाने शहर मे’ हे गीत डॉ. विनय कळीकर आणि डॉ. शिवांगी जहागीरदार, ‘ए मेरे हमसफर’ हे गीत डॉ. प्रशांत निंबाळकर, ‘बिन तेरे सनम’ हे गीत डॉ. सदाशिव भोळे व डॉ. शितल देशपांडे, ‘आधा है चंद्रमा’ हे गीत डॉ. बी.के.शर्मा व डॉ. विजया कांबळे, ‘मेघारे-मेघारे’ हे गीत डॉ. रवी मुंधडा व डॉ. गौरी अरोरा , ‘इतना ना मुझसे तू’ हे गीत डॉ. मकरंद धोपकर व डॉ. अंजली भांडारकर, ‘चार कदम चल दो ना’ हे गीत डॉ. विरज शिंगाडे आणि डॉ. रोशनी शिंगाडे, ‘दिल की जीरह खोल’ हे गीत डॉ. प्रदीप राजदेरकर व डॉ. वैशाली खंडाईत यांच्यासह डॉ. मुकुंद, डॉ. मंगला घोडेस्वार, डॉ. संदीप मेश्राम, डॉ. मेघा बालंखे, डॉ. रवी वानखेडे, डॉ. शिवांगी जहागीरदार,डॉ. गुरमुख, डॉ. विजया कांबळे, डॉ. यशोधरा अपराजित, डॉ. पी. गांधी, डॉ. अभय केळकर, डॉ. अंजली भांधारकर, डॉ. समीर जागीरदार, डॉ. गौरी अरोरा, डॉ. व्ही. पानेरकर, डॉ. युनूस शहा , डॉ. शितल देशपांडे, डॉ. प्रविण लाड, डॉ. रुफत खान, डॉ. सादीन सदावर्ते, डॉ. हसन मिर्झा, डॉ. शितल देशपांडे यांनी गीत सादर केले. ‘मै तैनु समझावाँ की’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. हे गीत डॉ. एस. माकडे व डॉ. मंजुळा घोडेस्वार यांनी गायले. प्रत्येक गीतला रसिकांकडून भरभरून दाद मिळाली.
संगीत नियोजन पंकज सिंग यांचे होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. प्रदीप राजदेरकर आणि डॉ. गौरी अरोरा यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) अध्यक्ष डॉ. किशोर टावरी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. कुश झुनझुनवाला उपस्थित होते. संचालन नासीर खान यांनी केले. (प्रतिनिधी)