शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

...तर मिनी बस अद्याप सुरू का नाही : मनपा आयुक्तांचा बैठकीत सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:22 PM

मेट्रो मार्ग, बाजारपेठ व अरुंद मार्गावर मिनी बस चालविण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. परिवहन विभागाच्या अकार्यक्षम कारभारामुळे दीड वर्षानंतर मिनी बसच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. आपली बस आॅपरेटरच्या बैठकीत आयुक्त अभिजित बांगर यांनी यावर नाराजी व्यक्त केली. डिम्टस्च्या सादरीकरणानंतर यातून महापालिकेला फायदा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दाट वस्तीच्या भागातील नागरिकांना बससेवा उपलब्ध होणार आहे, तर मग अद्याप मिनी बसेस सुरू का करण्यात आलेल्या नाहीत, असा सवाल आयुक्तांनी केला.

ठळक मुद्देवर्दळीच्या मार्गावर फेऱ्या वाढविण्याचे निर्देेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो मार्ग, बाजारपेठ व अरुंद मार्गावर मिनी बस चालविण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. परिवहन विभागाच्या अकार्यक्षम कारभारामुळे दीड वर्षानंतर मिनी बसच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. आपली बस ऑपरेटरच्या बैठकीत आयुक्तअभिजित बांगर यांनी यावर नाराजी व्यक्त केली. डिम्टस्च्या सादरीकरणानंतर यातून महापालिकेला फायदा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दाट वस्तीच्या भागातील नागरिकांना बससेवा उपलब्ध होणार आहे, तर मग अद्याप मिनी बसेस सुरू का करण्यात आलेल्या नाहीत, असा सवाल आयुक्तांनी केला.मेट्रो रेल्वे कॉरिडोरसोबतच रेल्वे स्टेशन, बसस्थानक, बाजारपेठ आदी भागातून या बसेसचे मार्ग निश्चित करून नागरिकांना सेवा उपलब्ध करा. अनेक मार्गावर स्टॅन्डर्ड बसेस चालविल्या जातात. परंतु प्रवासी मिळत नाही. अशा मार्गावर मिनी बसेस चालविणे शक्य आहे, तसेच ज्या भागातील मार्ग अरुंद आहेत अशा भागात मिनी बसेस चालविल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या कमी आहे, अशा मार्गावरील बसफेऱ्या कमी कराव्यात, तर ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक आहे अशा मार्गावर बसफेऱ्या वाढवाव्यात. तसेच ४५ मिनी बसचे मार्ग निश्चित करून या बसेस तातडीने सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.सध्या शहरात ३३० बसेस धावतात. बस ऑपरेटने ४५ मिनी बसेस खरेदी केलेल्या आहेत. यामुळे महापालिकेवर याचा आर्थिक बोजा पडलेला नाही. बैठकीला परिवहन व्यवस्थापन शिवाजी जगताप, डिम्टस्, तीन ऑपरेटरचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.‘कॉमन मोबिलीटी’ कार्ड सुरू करामेट्रो रेल्वे वाहतुकीला पूरक अशी मिनी बस सेवा सुरू करून कॉमन मोबिलीटी कार्ड देण्याचा प्रस्ताव परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी मंजूर केला होता. परंतु परिवहन विभागाने प्रस्तावावर विचारच केला नाही. मी बैठकीला उपस्थित नव्हतो. परंतु आयुक्तांनी कॉमन मोबिलीटी कार्डाचा पर्याय उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळाल्याचे बंटी कुकडे यांनी सांगितले. या प्रस्तावाला परिवहन समितीने आधीच मंजुरी दिली आहे. परंतु परिवहन व्यवस्थापकांना ही सुविधा उपलब्ध करावयाची नाही. त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव अद्याप अमलात आणलेला नाही.उत्पन्नात वाढ करापरिवहन विभाग तोट्यात आहे. तोटा कमी करण्यासाठी उत्पन्नात वाढ करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बसेसवर जाहिरात करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ न त्याची अंमलबजाणी करा, तसेच उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाAbhijit Bangarअभिजित बांगरcommissionerआयुक्त