शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
2
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
3
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेणार...
4
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
5
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
6
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
8
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
9
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
10
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
11
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
12
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
13
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
14
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

बंदीनंतरही ‘नायलॉन’ मांजाचा जीवघेणा उन्माद, पतंगाच्या हुल्लडबाजीत ४० वर जखमी

By सुमेध वाघमार | Published: January 15, 2024 9:01 PM

मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

सुमेध वाघमारे/ नागपूर : मकरसंक्रांतीच्या नावाखाली सोमवारी दिवसभर पतंगबाजीचा उन्माद दिसून आला. नायलॉन मांजामुळे दोन दुचाकीस्वाराचा गळा कापला. यातील एक गंभीर जखमी असून त्यांच्यावर उत्तर नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इतर किरकोळ घटनांमध्ये ४०वर जखमी झाले. यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती.

आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसºयाचा बळी घेणे किंवा जखमी करणे हे कुठेही सांगितलेले नाही. पण तरीही दिवसभर हे पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरश: धुमाकूळ घालीत होते. पतंगबाजांचा हा उन्माद आणि मस्ती उतरविण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असतानाही त्याची अंमलबजावणी होताना आज दिसून आलेली नाही. 

- नायलॉन मांजाने गळा कापल्याने लागले टाके कपीलनगर ठाण्यांतर्गत जरीपटका रिंग रोडवरून ५४ वर्षीय दुचाकीस्वार जात असताना अचानक नायलॉन मांजा समोर आला. काही कळण्याच्या आतच त्यांचा गळा कापला गेला. तिथे उपस्थित दोघांनी त्यांना कमाल चौक येथील मदन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखम खोल असल्याने डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलचे म्हणणे आहे. अशीच एक घटना भानखेडा येथील २८वर्षीय युवकासोबत घडली. नायलॉन मांजामुळे या युवकाचा गळा कापल्या गेल्याने मदन हॉस्पिटलमध्ये १० टाके लागले. या दोन्ही घटनेची माहिती कपीलनगर पोलीसांना मिळाल्यावर त्यांनी हॉस्पिटलमध्ये जावून विचारपूस केल्याची माहिती आहे. 

-मेयोमध्ये १२ जखमींवर उपचारइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) सोमवारी पतंगाच्या माजांमुळे जखमी झालेल्या १२ जखमींवर उपचार करण्यात आले. रुग्णालयाचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सांगितले, हे सर्व रुग्ण किरकोळ जखमी होते. यामुळे कॅज्युल्टीमध्येच उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली.

- पतंगाचा नादात ३२ वर्षीय तरुण वरून खाली पडलापतंगाचा नादात एक ३२वर्षीय तरुण पहिल्या मजल्यावरून खाली पडला. त्याचा डाव्या हाताला गंभीर जखमी झाला. मेडिकलच्या कॅज्युल्टीमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. या शिवाय, मांजामुळे ८ वर्षीय मुलाचा पाय कापला, १४ वर्षीय मुलाचा पाय कापल्याने टाके लावावे लागले, या शिवाय इतरही किरकोळ रुग्ण उपचारासाठी आले होते, अशी माहिती मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.  या शिवाय, रवीनगर, मानेवाडा, प्रतापनगर चौक, सदर, काटोल रोड, कोराडी रोड, कामठी रोड व उमरेड रोड मार्गावरील अनेक मोठ्या खासगी इस्पितळांत तीसच्यावर जखमींनी उपचार घेतल्याची माहिती आहे. 

- मांजा तुटतच नव्हताजखमी झालेल्या काहींनी ‘लोकमत’ला सांगितले, अचानक समोर आलेल्या मांजाला हात लावला आणि हाताची बोटे कापल्या गेली. हा मांजा तुटतच नव्हता. नायलॉन मांजावर बंदी असताना हा मांजा आला कुठून हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जिल्हाधिकारी व पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाºया व वापरणाºयांवर कारवाईचा इशारा दिला. काहींवर कारवाईही झाली. परंतु सोमवारी अनेक पतंगशौकीन नायलॉन मांजाचा सर्रास वापर करीत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :nagpurनागपूरMakar Sankrantiमकर संक्रांतीkiteपतंग