शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
14
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
15
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
16
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
17
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
18
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
19
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
20
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी

घोषणेला ४० वर्षे लोटूनही राज्यातील ७५ टक्के गावांमध्ये ग्रंथालये नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:24 IST

राज्यातील ३२,५०० गावे ग्रंथालयांविना : राज्याच्या संचालनालयाने दिलेल्या माहितीतून उघड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी महावाचन उत्सव राज्यातील ६६ हजार शाळांमध्ये साजरा केला. त्यावर ८ कोटी रुपयांचा खर्च केला. दुसरीकडे विश्व मराठी संमेलनाच्या आयोजनावर कोट्यवधी रुपये खर्च केले. गावागावांत वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी ग्रंथसंस्कृती विकसित करण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे पुरते दुर्लक्ष केल्याने राज्यातील ३२,५०० वर गावे ग्रंथालयांविना असल्याचे उघडकीस आले आहे.

उपराजधानीत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार राज्यात ३१ मार्च २०२४ अखेरीस जेमतेम ११,१५० सार्वजनिक ग्रंथालये आहेत, त्यात 'अ' वर्गाच्या ग्रंथालयांची संख्या ३२९, 'ब' वर्गाची २०७२, तर 'क' वर्गाची केवळ ३९७२ ग्रंथालये आहेत. बाकीची 'ड' वर्गाची आहेत. ही वर्गवारी ग्रंथसंख्येवर ठरत असते. गेल्या तीन वर्षात ग्रंथालयांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी ती घटत चालल्याचेही आकडेवारी सांगते. ३१ मार्च २०२२ पर्यंत सर्व वर्गाची मिळून राज्यात १२, १४९ सार्वजनिक ग्रंथालये होती. तीन वर्षांत त्यात वाढ होणे तर दूरच, उलट ही संख्या एक हजाराने घटली आहे. गेल्या तीन वर्षात ९९३ ग्रंथालयांची शासनमान्यता रद्द करण्यात आली आहे.

सर्वाधिक ग्रंथालये मराठवाड्यातउपलब्ध माहितीनुसार, सर्वाधिक ३८१३ ग्रंथालये मराठवाड्यात आहेत. त्याखालोखाल २६७५ पुणे विभागात, अमरावती विभागात १७६५, नाशिक विभागात १४२२, तर नागपूर विभागात केवळ ९५८ ग्रंथालये आहेत. सर्वाधिक कमी ५१७ ग्रंथालये मुंबईत आहेत.

७५ टक्के गावांत ग्रंथालय नाहीगाव तिथे ग्रंथालय' ही राज्याची ४० वर्षांपासून घोषणा आहे. राज्यात गावांची संख्या ४४,७३८ एवढी आहे, तर ग्रंथालयांची संख्या केवळ ११,१५० आहे. याचा अर्थ राज्यातील ७५ टक्के गावे अजूनही ग्रंथालय व पुस्तकांपासून वंचितच आहेत.

टॅग्स :libraryवाचनालयnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र