मूल्यांकन सर्व व्यवसायासाठी आवश्यकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:08 IST2021-07-30T04:08:16+5:302021-07-30T04:08:16+5:30
नागपूर : मूल्यांकनाचे महत्त्व केवळ आयकर आणि कंपनी अधिनियमांपर्यंतच मर्यादित नसून कंपनीकडून लाभासाठी व्यवसायाचे मूल्यांकन करणे अत्यंत आवश्यक आहे. ...

मूल्यांकन सर्व व्यवसायासाठी आवश्यकच
नागपूर : मूल्यांकनाचे महत्त्व केवळ आयकर आणि कंपनी अधिनियमांपर्यंतच मर्यादित नसून कंपनीकडून लाभासाठी व्यवसायाचे मूल्यांकन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच सर्व व्यवसायासाठी मूल्यांकन आवश्यक असल्याचे मत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) मूल्यांकन मानक बोर्डच्या केंद्रीय परिषदेचे सदस्य सीए अनिल भंडारी यांनी येथे केले.
आयसीएआय मूल्यांकन मानक-२०१८ वर चारदिवसीय अभ्यासक्रमच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यात संपूर्ण देशातील सीएंनी भाग घेतला. यावेळी नागपूर सीए शाखेचे अध्यक्ष सीए साकेत बागडिया उपस्थित होते. अभ्यासक्रम चर्चासत्रात सीए एमपी विजय कुमार, सीए राजन वाधवान, सीए विक्रम जैन, सीए दृष्टी देसाई, सीए तरुण महाजन, सीए सुश्रुत चितले, सीए सुमित ढड्डा, सीए रश्मी शाह यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सीए जितेंद्र सगलानी, उपाध्यक्ष, सीए अभिजित केळकर, सीए सुरेन दुरगकर, सीए किरीट कल्याणी, सीए अक्षय गुल्हाने, सीए संजय एम अग्रवाल उपस्थित होते.