महाराष्ट्र हॉटेल अँड फूड वर्कर युनियनची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST2021-02-06T04:14:24+5:302021-02-06T04:14:24+5:30
नागपूर : हॉटेल कामगार आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय कामगार नेता राजेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात हॉटेल अँड फूड ...

महाराष्ट्र हॉटेल अँड फूड वर्कर युनियनची स्थापना
नागपूर : हॉटेल कामगार आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय कामगार नेता राजेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात हॉटेल अँड फूड वर्कर युनियनची स्थापना करण्यात आली आहे. हॉटेल कामगारांचे किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, रोजगार सुरक्षेसोबत स्ट्रीट व्हेंडरची सामाजिक सुरक्षा, अतिक्रमण कारवाईत होणारे नुकसान याबाबत संघटना महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कामगारांनी संघटनेच्या वेबसाईटवर नोंदणी करावी, असे आवाहन संघटनेचे महासचिव गजानन जोशी यांनी केले आहे. संघटनेच्या कार्यकारिणीत मुख्य संरक्षक विनोद पटोले, अध्यक्षपदी राजेश निंबाळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत वासनिक, संजय फ्रान्सीस, महासचिव गजानन जोशी, संयुक्त सचिव किशोर माथने, पूनम तुरकर, शीतल सहारे, कोषाध्यक्ष विजय पलसकर यांचा तर सदस्यात जितू वासनिक, कैलाश भुयारकर, आनंद गुरव यांचा समावेश करण्यात आला आहे.
............