जलालखेड्यात अत्यावश्यक दुकाने केवळ पाच तास सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:43+5:302021-04-18T04:08:43+5:30
जलालखेडा : ग्रामीण भागातील वाढते काेराेना संक्रमण पाहता जलालखेडा येथे स्थानिक प्रशासन व व्यापाऱ्यांची नुकतीच सभा घेण्यात आली. या ...

जलालखेड्यात अत्यावश्यक दुकाने केवळ पाच तास सुरू राहणार
जलालखेडा : ग्रामीण भागातील वाढते काेराेना संक्रमण पाहता जलालखेडा येथे स्थानिक प्रशासन व व्यापाऱ्यांची नुकतीच सभा घेण्यात आली. या सभेत अत्यावश्यक सेवेची दुकाने ही केवळ पाच तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. साेबतच शनिवार व रविवारी सर्वच दुकाने पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
साेमवार ते शुक्रवारी सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहतील, तसेच शनिवार व रविवारी ही सर्वच दुकाने पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ दवाखाने व मेडिकल स्टाेर्स आठवड्यात पूर्ण वेळ सुरू राहतील, तसेच आठवडी बाजार पूर्णत: बंद राहील. भाजी विक्रेत्यांना सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत भाजीपाला विक्री करता येईल, गावात हातठेल्यावरही भाजी विक्री करता येईल. विनाकारण फिरणाऱ्यांवर पाेलिसांकडून कडक कारवाई केली जाईल. सर्व दुकानदार व तिथे काम करणाऱ्या नाेकरांना काेराेना चाचणी करणे गरजेचे असून, सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्बंधाबाबत गावकऱ्यांना लाऊडस्पिकरद्वारे सूचना देण्यात आली. या बैठकीला सरपंच कैलास निकाेसे, उपसरपंच मयूर सोनोने, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, ग्रा.पं. सदस्य मयूर दंढारे, सुरेश बारापात्रे, ईश्वर उईके, अतुल पेठे, सुधीर खडसे, अजय कळंबे, जगदीश बारमासे, सुरेश भालसागर, प्रदीप गोयानी, सचिन चौधरी, बबलू नागमोते, अमिष चौधरी, नितीन तिवारी, योगेश त्रिपाठी, योगेश मानकर, दीपक गायकवाड, अजय कवरे, मेहबूब बानवा, मनोज खुटाटे, गोपाल मोरे, नीलेश चरपे, नागेश वर्मा, ग्रामविकास अधिकारी सुनील इचे आदी उपस्थित हाेते.