होम प्लॅटफार्मवरील प्रवाशांसाठी एस्केलेटरची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:25 AM2019-10-12T01:25:06+5:302019-10-12T01:26:11+5:30

होम प्लॅटफार्मवर प्रवाशांना उतरणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने एस्केलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली असून आगामी पाच दिवसात हे एस्केलेटर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Escalator facility for travelers on the home platform | होम प्लॅटफार्मवरील प्रवाशांसाठी एस्केलेटरची सुविधा

होम प्लॅटफार्मवरील प्रवाशांसाठी एस्केलेटरची सुविधा

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाचा निर्णय : प्रवाशांना उतरणे होणार सोयीचे

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : होम प्लॅटफार्मच्या सौंदर्यीकरणासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. होम प्लॅटफार्मवर प्रवाशांना उतरणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने एस्केलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली असून आगामी पाच दिवसात हे एस्केलेटर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरात होम प्लॅटफार्म आहे. या प्लॅटफार्मवर प्रवाशांना डायरेक्ट टु कोचची सुविधा उपलब्ध आहे. प्लॅटफार्मच्या सौंदर्यीकरणासाठी रेल्वे प्रशासनाने स्टीलचे बेंच, लॉन, नॅरोगेज कोचमध्ये उपाहारगृह आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. होम प्लॅटफार्मच्या बाजूला सुरुवातीला एक एस्केलेटर उपलब्ध होते. या एस्केलेटरवरून वर चढणाऱ्या प्रवाशांना सुविधा होत होती. परंतु आता या ठिकाणी दुसरे एस्केलेटर उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पाऊल उचलले आहे. पश्चिमेकडील भागातून येणाऱ्या प्रवाशांना होम प्लॅटफार्मवर जाण्यासाठी पायऱ्या उतरून जाण्याची गरज नसून थेट एस्केलेटरच्या साहाय्याने ते होम प्लॅटफार्मवर जाऊ शकणार आहेत. एस्केलेटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून आगामी पाच दिवसात हे एस्केलेटर प्रवाशांच्या सुविधेसाठी उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे हातात वजन असलेली बॅग घेऊन होम प्लॅटफार्मवर जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: Escalator facility for travelers on the home platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.