शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

जेम्स प्रणालीत 'एरर' आल्यामुळे सव्वा कोटींच्या फेरनिविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 11:28 PM

सरकारने शासकीय कार्यालयासाठी अथवा शासकीय योजनांच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी जेम्स ही प्रणाली राबविली आहे. पण जि.प.मध्ये ही प्रणाली हाताळण्याकरिता टेक्नोसॅव्ही कर्मचाऱ्यांच्या अभाव आहे. त्याचा फटका आता विविध विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांना बसतो आहे. जेम्स प्रणालीत एरर आल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाला सव्वाकोटीच्या फेरनिविदा मागवाव्या लागत आहेत.

ठळक मुद्देनागपूर जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभागसुसज्ज कक्ष आणि तंत्रज्ञ नसल्याचाही परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारने शासकीय कार्यालयासाठी अथवा शासकीय योजनांच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी जेम्स ही प्रणाली राबविली आहे. पण जि.प.मध्ये ही प्रणाली हाताळण्याकरिता टेक्नोसॅव्ही कर्मचाऱ्यांच्या अभाव आहे. त्याचा फटका आता विविध विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांना बसतो आहे. जेम्स प्रणालीत एरर आल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाला सव्वाकोटीच्या फेरनिविदा मागवाव्या लागत आहेत.जिल्हा परिषदेत जेम्स प्रणालीवर निविदा भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष आणि तंत्रज्ञांचा अभाव आहे. त्यामुळे महिला बालकल्याण विभागाला सव्वाकोटींच्या कामांच्या फेरनिविदा मागविण्याची वेळ आली़ या प्रकारामुळे लाभार्थ्यांना वेळेत पोहोचणाऱ्या योजना उशिरा मिळण्याची शक्यता आहे़ ही कासवगती अशीच राहिल्यास लोकपयोगी योजना पूर्णत: लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याचीही भीती व्यक्त होत आहे़ महिला बालकल्याण समिती पदाधिकाऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे़ वाहन चालविणे आणि एमएससीआयटी संगणकीय अभ्यासक्रम प्रशिक्षण व अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्यांना खेळणी साहित्य वाटपाच्या योजनांचा यामध्ये समावेश आहे़ डिसेंबर महिन्यात या कामांच्या निविदा जेम्स या ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करण्यात आल्या होत्या़ महिला व बालकल्याणच्याच काही कुशल कर्मचाऱ्यांनी ही सर्व प्रक्रिया केली़ परंतु, जेव्हा या प्रणालीवरून निविदा उघडण्याची वेळ आली़ त्यावेळी संपूर्ण सिस्टम लॉक दाखवित होती़ वारंवार तसा संदेश या प्रणालीवर यायचा़ ही बाब जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आली़ परंतु, तंत्रज्ञानापुढे अधिकाऱ्यांनी हात टेकले़ विभागाच्या विषय समिती बैठकीतही हा मुद्दा चर्चिला गेला़ त्यावेळी डोक्यावर हात मारून घेण्याशिवाय कुण्याही पदाधिकाऱ्यांकडे पर्याय नव्हता़ आणखी या निविदा प्रक्रियेला आठवडा जाईल, असे या विभागाचे विभागप्रमुख सांगतात़जेम्समुळे अडचणी वाढल्यापूर्वी निविदांचे कार्य सुरळीत होण्यासाठी विशेष कक्ष निर्मिती आणि तंत्रज्ञ नियुक्तीला होते़ आता हा कक्षच गुंडाळण्यात आला़ तो का बंद झाला हे कळायला मार्ग नाही़ जेम्स प्रणालीमध्ये अजूनही पारदर्शकता नाही. त्यामुळे हा प्रकार सर्वच विभागात सुरू आहे़ आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कामाची गती वाढवायची असेल तर ही प्रक्रिया पुन्हा सुरू होणे गरजेची आहे, अशी मागणी काही जि.प़. सदस्यांकडून पुढे आली आहे़ निविदा या प्रणालीवरून करप्ट झाल्याची बाब खरी आहे़ लाभाच्या योजना तत्काळ कार्यन्वित व्हाव्या, यासाठी फेरनिविदा करण्यात आल्यात़ पुढील आठवड्यापर्यंत त्या प्रत्यक्षात उतरतील़ भागवत तांबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण विभाग

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर