पर्यावरण दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:43+5:302021-06-09T04:10:43+5:30
कामठी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कृषी व ग्रामविकास विभागाच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या ऑनलाईन ...

पर्यावरण दिन उत्साहात
कामठी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कृषी व ग्रामविकास विभागाच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
या ऑनलाईन कार्यक्रमात जानकी दादी, गुलजार दादी, ईशु दादी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या दिवंगतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वड, पिंपळ, कडूनिंबाच्या राेपट्यांची लागवड करण्यात आली. ब्रह्मकुमार महेंद्रभाई ठाकूर यांनी अध्यात्म आणि पर्यावरणाबाबत मार्गदर्शन केले. यात त्यांनी वृक्ष व पाण्याचे पर्यावरणातील महत्त्व पटवून दिले. प्रमुख अतिथी अवंतिका लेकुरवाळे यांनी प्रदूषण कमी करण्याबाबत मार्गदर्शन केले. ब्रह्माकुमारी शीलू दीदी यांनी पर्यावरण व जीवन सुरक्षाबाबत सर्वांना प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमानंतर सेवास्थानच्या दीदींनी कामठी तालुक्यातील रनाळा, कामठी, येरखेडा, भिलगाव, गादा, कापसी, सावनेर तालुक्यांतील खापा, खापरखेडा, रामटेक तालुक्यातील नगरधन, माैदा तालुक्यातील तारसा, पारशिवनी तालुक्यातील कन्हान, तसेच धनी येथे वृक्षारोपण केले.
===Photopath===
060621\2124img-20210605-wa0251.jpg
===Caption===
वृक्षारोपण करताना ब्रह्मकुमारी प्रेम लता दीदी