शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Maharashtra Election 2019 : राजकारणात प्रवेश... कधीच नाही !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 5:42 AM

अमृता फडणवीस यांची मुलाखत । कार्यकर्ते हाच मुख्यमंत्र्यांचा चेहरा

योगेश पांडे/कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१४ च्या तुलनेत आता स्थिती व निवडणुकीतील प्रचारातील भूमिका बदलली आहे. अगोदर केवळ मतदारसंघापुरता प्रचार मर्यादित होता, आता मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याची धुरा आहे. मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी एक ‘व्हिजन’ पाहिले व त्या दृष्टीने कार्य केले.

सकारात्मक प्रवासाची ही गती कायम राहील व पुढील पाच वर्षदेखील विकासाचीच असतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असताना अमृता फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील प्रचारावर भर दिला आहे. यावेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.ग्रामविकासाला नवीन  गती मिळेल. 

ज्या दिशेने मुख्यमंत्र्यांनी काम केले आहे ते पुढील पाच वर्षांत निश्चितच कायम असेल. ‘जलयुक्त शिवार’मुळे अनेक शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता दूर झाली आहे. परंतु या योजनेत आणखी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून काम झाले पाहिजे. ‘क्लायमेट सायन्स’वरदेखील भर दिला गेला पाहिजे. त्यामुळे शेतकºयाला तंत्रज्ञानाचा आधार मिळेल. सोबतच बचत गटाला जास्तीत जास्त ‘मार्केट’ मिळावे व यातून ‘स्टार्ट अप्स’ समोर यावेत यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

नागपूरचा चेहरामोहरा बदलणार‘लॉजिस्टिक’मध्ये प्रचंड बदल घडून येईल. ‘मिहान’च्या कामालादेखील गती मिळाली आहे. अडथळे दूर होत आहेत. २०० कोटी नागपूर रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणासाठी दिले आहेत. यामुळे पर्यटन व गुंतवणुकीला चालना मिळेल. नागपुरात दीक्षाभूमी, कोराडी, रामटेक या पर्यटन स्थळांना आवश्यक निधी दिला व येथील सुविधा वाढविण्यावर भर दिला. दीक्षाभूमीला तर ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. मागील पाच वर्षांप्रमाणेच विकासाची गती राहिली तर नागपूर २०३० मध्ये हे जगातील सर्वात जास्त प्रगती करणाºया अव्वल १० शहरात समाविष्ट होईल असे ‘वर्ल्ड इकॉनॉमी फोरम’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२४ पर्यंत शहराचा चेहरामोहराच बदलेल, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

फेटरीकर माझे कुटुंबीयचमुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात मागील पाच वर्षांत आमूलाग्र बदल झाले आहेत. फेटरीकर माझे कुटुंबीयच झाले आहेत. तेथे जाऊन मला समाधान मिळते. फेटरी हे आदर्श गाव झाले आहे. पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. अगोदर तेथे अनेक समस्या होत्या. अंगणवाड्या, ग्रामविकास केंद्राचा विकास झाला आहे. परंतु तरुणांना जास्त रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. ‘फॅशन डिझायनिंग’साठी ‘सेटअप’ करतो आहे. यात तेथील महिलांना घरबसल्या रोजगार मिळू शकेल, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या जेवणासाठी असते काळजीप्रचाराची व्यस्तता असल्यामुळे मुख्यमंत्री नियमित व्यायाम करू शकत नाहीत. त्यांची झोपदेखील पूर्ण होत नाही. जेवणाची वेळदेखील पाळता येत नाही, त्याची काळजी वाटते. मात्र मुख्यमंत्री जेथेही जातील त्यांच्या आहारासंदर्भात मी आवश्यक त्या सूचना ‘स्टाफ’ला देते. त्यातही अनेकदा बाहेर खावे लागते. परंतु आता लोक ‘डायट फूड’ देत असल्याचे दिसून येत आहे, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.2014 पर्यंत महाराष्ट्र व नागपुरातील अनेक प्रकल्प केवळ फायलींमध्ये होते. ते प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात केवळ सुरूच झालेले नाहीत, तर त्यांना गती मिळाली आहे. ‘स्मार्ट सिटी’पासून ‘जलयुक्त शिवार’, मेट्रो, समृद्धी महामार्ग, शिक्षणसंस्था, ग्रामविकासापर्यंत विविध मुद्यांत मुख्यमंत्र्यांनी चौफेर लक्ष दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केवळ नागपूरच नव्हे तर इतर शहरांतदेखील विकास घडवून आणला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या ‘व्हिजन’मुळे विकास दिसून येत आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019nagpur-east-acनागपूर पूर्व